Akola News : कमी पावसामुळे या वर्षी प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट आली होती. सिंचनासाठी बहुतांश प्रकल्पातून पाणी न मिळाल्याने पीक लागवडीवरही परिणाम झाला. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात चाराचंटाईचे चटके जाणवू लागले आहेत.
या वर्षी मार्च महिन्यापासून चाऱ्याच्या टंचाईला सुरुवात झाली आहे. यंदा कमी व असमतोल पावसामुळे चारा उत्पादनात घट झालेली आहे. पशुपालकांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची लागवड केलेली आहे.
मात्र याच महिन्यात अवकाळी व वादळाने ज्वारीच्या पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने चाऱ्याचाही दर्जा खालावला आहे. अकोला जिल्ह्यात पाच लाख, बुलडाणा जिल्ह्यात साडेसात लाखांवर पशुधन आहे. या जनावरांसाठी दिवसागणिक चाऱ्याची आवश्यकता भासत आहे. सध्या चाराटंचाई नाही, असे प्रशासन सांगत असून चारा बियाणे वाटपाचाही दावा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.
परप्रांतीय कळप दाखल
खरीप, रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन मिळाल्यानंतर अवशेषाच्या रूपात जनावरांना शेतशिवारात चारा उपलब्ध होतो. या चाऱ्यासाठी परप्रांतातील जनावरांचे कळप या वर्षी गुजरातसह इतर भागांतून दाखल झाले आहेत. त्यामुळे स्थानिक जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न तयार झाला आहे.
...असे आहेत दर
ढेप ६० किलो बॅग १८५० रुपये
सुग्रास ५० किलो १३२०
मका भरडा ५० किलो १३००
गायीचे दूध दर ३.५ फॅटसाठी २९ रुपये
म्हैस ६.० फॅट ४५ रूपये
बाहेरील जिल्ह्यातून चारा आयात करावा लागतो आहे. आज चाऱ्याचा दर प्रतिकिलो पाच ते सात रुपये आहे. दूध उत्पादनातही घट होऊ लागली आहे.प्रतीक साबे, पशुपालक, खरबडी
दुधाचे दर कमी झाले आहेत. दुसरीकडे चाऱ्याचे उत्पादन कमी झाल्याने परराज्यांतून चारा आणण्याची वेळ आली आहे. यासाठी अधिकचा खर्च होत आहे. बाजारात पशुधनाला चांगली किंमत मिळत नसल्याने दुहेरी संकट ओढवले आहे.अमोल खर्चे, दूध उत्पादक, आडविहिर
माझ्याकडे ३ गायी आहेत. या वर्षी चाराटंचाई निर्माण झाली. त्यामुळे दूग्ध व्यवसाय करणे अवघड झाले आहे.विक्रम जाधव, शेतकरी, धाड. जि. बुलडाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.