Fodder camp : राज्यात पहिली चारा छावणी छ. संभाजी नगरमध्ये सुरू; पहिल्याच दिवशी ७०० जनावरे छावणीत दाखल

Fodder camp In Ch. Sambhaji Nagar : राज्यात उन्हाची दाहकता वाढत असून अनेक जिल्ह्यातील पारा ४० पार गेला आहे. यादरम्यान वाढत्या उन्हाची झळ आणि पाणी टंचाईमुळे मुक्या जनावऱ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Fodder camp
Fodder campAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विविध जिल्ह्यातील तापमान ४० अंशाच्या जवळ पोहचले असून सर्वसामान्यांसह पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने शेतीचा पाणीपुरवठा कमी करण्यात आला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर बनला आहे. यादरम्यान राज्यातील पहिली चारा छावणी मराठवाड्यात सुरू करण्यात आली असून ती छ.संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे सुरू करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका यंदा छ.संभाजी नगर जिल्ह्याला बसला आहे. येथील पैठणच्या जायकवाडी धरणात फक्त १४.२९ टक्के पाणी शिल्लक राहीले आहे. यामुळे हे पाणी सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. तर गरज पडेल तसे नियोजनानुसार शेतीसाठी आवर्तने सोडली जात आहे. पण पाण्याचीटंचाई यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Fodder camp
Fodder Camp Pune : जुन्नरच्या पाच गावांचे चारा छावणीसाठी प्रस्ताव

आमदार प्रशांत बंब यांनी जिल्ह्यातील गंभीर होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात चारा छावणी सुरू केली आहे. बंब यांनी ही छावणी जिल्ह्यातील खोजेवाडी येथे सुरू केली असून पहिल्याच दिवशी सुमारे ७०० जनावर येथे दाखल झाली आहेत. या चारा छावणीमुळे मात्र जिल्ह्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तर ही चारा छावणी राज्यातील पहिली ठरली आहे.

Fodder camp
Green Fodder Issue : हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादनात तब्बल ३० टक्क्यांनी घट

दरम्यान जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १३८ मोठ्या धरणांमध्ये बुधवारी (ता.१७) उपयुक्त पाणीसाठा हा ३१.७३ शिल्लक राहिला आहे. तर सर्व २९९४ धरणांमध्ये ३२.६३ टक्के पाणी शिल्लक आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माहितीनुसार राज्यातील १८३४ गावे आणि ४४३४ वाड्यावस्त्यांना २३२० टँकरने पाणी पुरवले जात आहे.

सर्वाधिक टँकर हे मराठवाड्याला लागत असून मराठवाड्यात ११८३ टँकर फिरत असल्याची माहिती मंगळवारी विभागाने दिलेल्या माहितीवरून समोर येत आहे. मराठवाड्यातील फक्त हिंगोली जिल्हा वगळता इतर सात जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू आहेत. सर्वाधिक टँकर हे छ.संभाजी नगरमध्ये फिरवले जात असून येथे ५२७ टँकर दररोज लागत आहेत. यावरून जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता समोर येत आहे. यापाठोपाठ जालना जिल्ह्यात- ३५८, बीड जिल्ह्यास-१९९ आणि धाराशिव जिल्ह्यात ८४ टँकर लोकांची तहान भागवत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com