Fodder Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : परराज्यांतील जनावरांच्या अडचणीमुळे चाराटंचाईत भर

Animal Issue : राजस्थान, गुजरातमधून हजारो जनावरे या भागात दाखल झालेली असून, यामुळे चाऱ्याचे दर वाढले आहेत. बाहेरील व्यापारी येथे जास्त पैसे देऊन चारा खरेदी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना वैरण मिळणे कठीण झाले आहे.

Team Agrowon

Buldhana News : राजस्थान, गुजरातमधून हजारो जनावरे या भागात दाखल झालेली असून, यामुळे चाऱ्याचे दर वाढले आहेत. बाहेरील व्यापारी येथे जास्त पैसे देऊन चारा खरेदी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना वैरण मिळणे कठीण झाले आहे. या भीषण चाराटंचाईचा फटका दूध उत्पादनाला बसत असून जनावरांसाठी वर्षभर चारा कसा उपलब्ध करावा, अशी चिंता दूध उत्पादकांसमोर उभी राहिली आहे.

या वर्षी खरीप हंगामापासूनच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनवर येलो मोझॅकमुळे संपूर्ण पाने गळून गेली होती. रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण असलेल्या मक्याची लागवड पाण्याअभावी अल्प प्रमाणात झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पुरेसा चारा नाही. चारा महागल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे.

धाडसह बुलडाणा तालुक्यातील ग्रामीण तरुण शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे. धाड परिसरातून तब्बल ३० ते ३५ हजार लिटर दूध दररोज विविध डेअरींच्या माध्यमातून संकलन केले जाते. अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असल्यामुळे या जनावरांना मोठ्या प्रमाणात चारा लागतो.

यासाठी दूध उत्पादक शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील चारा साठवून ठेवतात. सोयाबीन, तुरीचे कुटार नाही. मक्याची लागवड कमी असल्याने जनावरांना वर्षेभर पुरेल एवढ्या कुटीची साठवणूक कशी करावी हा पेच आहे. परिसरातील करडी, मासरुळ येथील पद्मावती ढालसांगवी धरणासह अनेक लहान मोठे प्रकल्पांमध्ये कमी प्रमाणात साठा या वर्षी होता. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मक्याची लागवड करणे जुळले नव्हते.

माझ्याकडे तीन दुधाळ गायी आहेत. या वर्षी कमी पाऊस झाला व धरणामध्ये कमी पाणी होते. त्यामुळे रब्बी हंगामात मका न पेरता हरभऱ्याची लागवड करावी लागली. आता चाऱ्याची टंचाई निर्माण झाली. शासनाने दुधाळ जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा.
विक्रम जाधव, दूध उत्पादक, धाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Cultivation : खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

Farmers Compensation : नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळाली पाहिजे

Crop Harvesting : खानदेशात पीक काढणी, मळणीस वेग

Onion Farming : कांदा रोपवाटिका करताना घ्यावयाची काळजी

Cucumber Farming : वाळकीच्या शेतकऱ्यांना मिळतेय काकडीचे सुधारित लागवड तंत्र

SCROLL FOR NEXT