Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Rate : विदर्भात चाऱ्याला कवडीमोल भाव

Fodder Update : ज्वारीच्या कडब्याची उत्पादकता वाढल्याने त्याचेही दर प्रभावित झाले आहेत. दहा रुपयांवरून थेट दोन रुपयांवर हे दर आल्याने शासनाने यात हस्तक्षेप करून चारा खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

Team Agrowon

Yavatmal News : उन्हाळी ज्वारीखालील क्षेत्रात वाढ झाल्याच्या परिणामी यंदा बाजारात ज्वारीच्या दरातही घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने ज्वारीचे व्यवहार होत आहेत. त्यातूनच ज्वारीच्या कडब्याची उत्पादकता वाढल्याने त्याचेही दर प्रभावित झाले आहेत. दहा रुपयांवरून थेट दोन रुपयांवर हे दर आल्याने शासनाने यात हस्तक्षेप करून चारा खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

यंदा उष्णतेच्या झळा व पाणीटंचाईचा फटका माणसांबरोबरच मुक्या जनावरांनाही बसत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात एका गोशाळा चालकाने पशुधनासाठी घरातील दागिने गहाण ठेवल्याचे वास्तव समोर आले आहे. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात यंदा ७५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळी ज्वारीचे पीक घेतल्याने अतिरिक्त कडब्यामुळे त्याला कोणी घेणार नसल्याने कडब्याचे दर कोसळले आहेत.

यामुळे दोन्हीकडील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. मराठवाड्यात मुक्या जनावरांची पोटे, चारा नसलेल्या दावणीला अन् चाऱ्यासाठी वाट पाहणाऱ्या जनावरांचा हंबरडा हे चित्र छत्रपती संभाजीनगर मधील पारुंडी गावातील गोशाळेत निर्माण झाल्याने गो शाळा चालकाने त्यांच्या सुनेचे दागिने गहान ठेवून जनावरांसाठी चारा आणला आहे. या विपरित परिस्थिती विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असून उन्हाळी ज्वारी काढणी वेळी आलेल्या अस्मानी संकटामुळे मजुरांनी ज्वारी काढणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे शेतकऱ्यांकडून घेतले.

ज्वारीचे उत्पादनही चांगले झाले पण ज्वारीचे धांडे/कडबा गोळा करून त्याच्या पेंढ्या बांधायला मात्र शेतकऱ्याला तारेवरची कसरत करावी लागली. कडब्याची एक पेंढी १० रुपयांना विकली जात असताना अतिराक्त चाऱ्यामुळे दर दोन ते तीन रुपयांवर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातच नाफेडद्वारे हमीभावाने ज्वारी खरेदी केली जात नसल्याने सोन्या, मोत्याप्रमाणे पिकलेल्या ज्वारीला खुल्या बाजारात अल्प दरात विकावे लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.

मराठवाड्यात मात्र तीव्र चारा टंचाईमुळे पशुधन कसे जगवावे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असून शासनाने मराठवाड्यातील पशुधनाची भूक भागविण्यासाठी व विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय दराने कडबा खरेदी करून दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे झाले आहे.

ज्वारी पीक उत्पादकांचा कडबा अत्यंत कवडीमोल भावानेही खरेदी करायला कोणी पुढे येत नसून मजुरांना केवळ कापून नेण्यासाठी शेतकऱ्यांना साकडे घालावे लागत आहे. तर मराठवाड्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने बळीराजावर मोठे संकट उभे राहिले असून विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कडब्याची शासकीय खरेदी करावी.
विशाल गायकवाड, ज्वारी उत्पादक शेतकरी, वालतूर रेल्वे (ता. पुसद, जि. यवतमाळ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT