Animal Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Fodder : शेतकऱ्यांचे चारासंकट टळले

Agriculture Update : शहापूर तालुक्यातील १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनी भातबियाणे व अन्य खरीपाची पेरणी केली. उर्वरित ८५ ते ९० टक्के शेतकरी पावसाची वाट पाहत होते

Team Agrowon

Mumbai News : पावसामुळे शेतकऱ्याने भातपेरण्या आणि इतर शेती मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता पाऊस मात्र अनियमित बरसत आहे. असे असले तरी गुरांना चरण्यासाठी माळरानावर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उगवला असल्याने शेतकऱ्यांचे चारा संकट टळले आहे.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात मिरगाच्या पावसाने दमदार सलामी दिल्याने बळीराजा सुखावला होता. शहापूर तालुक्यातील १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनी भातबियाणे व अन्य खरीपाची पेरणी केली. उर्वरित ८५ ते ९० टक्के शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पाऊस पडल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये, असे वारंवार कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत होते.

त्यामुळे काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. गुरांना चरण्यासाठी माळरानावर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उगवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चारा संकट मात्र टळले आहे.

अनेक महिन्यांपासून कोरडा चारा खाल्लेल्या गुरांना पावसाळ्यात हिरवा चारा दिसल्यानंतर ते अति प्रमाणात खातात. अशाने गुरांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. जंतू संसर्ग होऊ नये, म्हणून दवाखान्यातून जंतू निर्मूलन लस देऊन पशुधन जोपासावे.
डॉ. तृप्ती कुलकर्णी, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, शहापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT