Sunflower Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Oilseed Sowing : बारामतीत सूर्यफूल, करडईच्या पेरणीसाठी लक्ष्यांक

Baramati Agriculture Plan : पुणे जिल्ह्यात दिशा कृषी उन्नती २०२९ या क्लस्टर संकल्पनेनुसार केळी, अंजीर व डाळिंब तसेच गळीत धान्यअंतर्गत सूर्यफूल व करडई लागवड करण्यासाठी लक्ष्यांक देण्यात आले.

Team Agrowon

baramati News : पुणे जिल्ह्यात दिशा कृषी उन्नती २०२९ या क्लस्टर संकल्पनेनुसार केळी, अंजीर व डाळिंब तसेच गळीत धान्यअंतर्गत सूर्यफूल व करडई लागवड करण्यासाठी लक्ष्यांक देण्यात आले. यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांचासुद्धा सहभाग घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच रिसोर्स फार्मर्स यांची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जिंतेद्र डुडी यांनी केल्या.

बारामती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजनाची अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली कन्हेरी येथील तालुका फळरोपवाटिका येथे शुक्रवारी (ता. ९) पार पडली. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक व सेवक उपस्थित होते.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, की बारामती तालुक्यात सूर्यफूल, करडई पिकांसाठी पोषक वातावरण व चांगली जमीन आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून या भागात हळूहळू वाढ होत आहे.

येत्या काळात या क्षेत्रात वाढ करण्यासाठी अधिकाऱ्यांना लक्ष्यांक देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यानुसार क्षेत्रात वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच लागवड पूर्वतयारीपासून काढणी पश्चात तंत्रज्ञान व निर्यातक्षम उत्पादन करून फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काम करावे.

पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी ॲग्रीस्टॅक, पीएम किसान, महाकृषी ॲप याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक प्रवीण माने यांनी बीज प्रक्रिया व घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणीबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक अंगद शिंदे यांनी ऊस बेणे प्रक्रिया व सुपर केन नर्सरी संकल्पना कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT