Oilseed Cultivation : डहाणू तालुक्यात सूर्यफूल, तिळाच्या शेतीला प्रतिसाद

Sunflower Cultivation : डहाणू तालुक्यातील शेतकरी पारंपरिक भातशेतीसोबत आता सूर्यफुल आणि तीळ शेतीकडे वळू लागले आहेत.
Sunflower Cultivation
Sunflower CultivationAgrowon
Published on
Updated on

Palghar News : डहाणू तालुक्यातील शेतकरी पारंपरिक भातशेतीसोबत आता सूर्यफुल आणि तीळ शेतीकडे वळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर शुद्ध आणि आरोग्यासाठी उपयुक्त तेल घरीच तयार करता येणार आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी केवळ भातशेतीवर अवलंबून होते, मात्र कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे शेतकरी वाल, हरभरा, तीळ, सूर्यफुल, मोगरा, झेंडू, कारले, गवार, टरबूज यांसारख्या विविध पिकांकडे वळू लागले आहेत.

Sunflower Cultivation
Ornamental Sunflower, white Marigold : शोभिवंत सूर्यफूल, पांढऱ्या झेंडूची नवी जात

डहाणूतील सायवन, बापूगाव, धरमपूर, निंबापूर, रानशेत, शेणसरी, गांगोडी या गावांमध्ये विशेषतः सूर्यफुल आणि तीळ शेतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात भेसळयुक्त खाद्यतेल विकले जात आहे. त्यामुळे अनेकांना लठ्ठपणा, हृदयरोग, रक्तदाब यांसारख्या आरोग्य समस्या जाणवत आहेत.

Sunflower Cultivation
Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी वाढली; क्षेत्र ४००० हेक्टरवर

यावर उपाय म्हणून शेतकरी आता आपल्या जमिनीतच तेलबिया पिकवण्यास प्राधान्य देत आहेत. सूर्यफुल, भुईमूग, शेंगा यासारखी पिके घेत असून, स्वतःसाठीच नव्हे तर बाजारासाठीही शुद्ध तेल उत्पादनाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

सूर्यफुलाच्या तेलात लिनोलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळा अशा तिन्ही हंगामांत घेतले जाऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com