
Washim News : भारतासारख्या देशाच्या खाद्यतेल गरज स्वयंपूर्णतेसाठी तेलबिया प्रक्रिया व मूल्यवर्धन क्रांतीची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
वाशीम कृषी विज्ञान केंद्रातर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (तेलबिया पीक), भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कृषी तंत्रज्ञान तंत्र प्रयोग प्रसार संस्था (पुणे), अखिल भारतीय जवस व मोहरी संशोधन प्रकल्प (नागपूर) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तेलबिया आदर्शगाव उपक्रमाअंतर्गत तेलबिया पिकाच्या उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी जवस पीक शेतीदिन व करडी पीक प्रक्षेत्र भेट कार्यक्रम रविवारी (ता. २) नेतन्सा (ता. रिसोड, जि. वाशीम) येथे गजानन बाजड यांच्या शेतात घेण्यात आला.
या वेळी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. गडाख बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितीन कोष्टी, केव्हीकेचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. बिना नायर (प्रमुख, जवस व मोहरी पैदासकार संशोधन केंद्र, नागपूर) यांची उपस्थिती होती.
या वेळी जवस व मोहरी संशोधन केंद्रातील डॉ. स्वप्नील ठाकरे व डॉ. कामडी (नागपूर) तसेच कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ राजेश डवरे, तुषार देशमुख आणि डॉ. दिगंबर इंगोले उपस्थित होते. या वेळी डॉ. स्वप्नील ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाची सविस्तर माहिती दिली व तेलबिया पीक उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. नायर यांनी जवस पीक आंतरपीक तंत्रज्ञानाद्वारे उत्पन्नवाढ आणि आर्थिक लाभ कसा साधता येईल, याविषयी माहिती दिली. डॉ. काळे यांनी शेती प्रयोगांद्वारे शेतकऱ्यांचा आर्थिक नफा वाढवणे आणि ग्रामीण भागातील सामाजिक स्थिरता राखणे हे कृषी संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. डॉ. खर्चे यांनी कृषी विद्यापीठनिर्मित तंत्रज्ञान व तंत्रप्रसाराच्या माध्यमातून उत्पादनवाढीवर भर देण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमाला उपस्थित तज्ज्ञ व शेतकऱ्यांनी जवस पीक वाण पीडीकेवी एनएल २६० आणि करडई पीक वाण आयएसएफ ७६४ यांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याच्या उत्पादनक्षमतेबद्दल माहिती घेतली. नेतन्सा, कवठा, केनवड, शेलू खडसे आणि एरंडा येथील अनेक प्रगतिशील शेतकरी या वेळी उपस्थित होते. गजानन बाजड व केरळ येथील श्री. खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तुषार देशमुख यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.