tree of temptation Agrowon
ॲग्रो विशेष

पश्चिम पट्ट्यात फुलली मोह फुले

आदिवासी बांधवांकरिता मोहाचे झाड कल्पवृक्ष

टीम अॅग्रोवन

वार्सा, जि. धुळे : धुळ्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील मोहगाव (ता. साक्री) येथे व परिसरात महूफुलांचा (Flower season) हंगाम चालू आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात महू फुलांनी साक्री- तालुक्यातील पिंपळनेरचा पश्चिम पट्टा बहरला आहे. पश्चिम पट्ट्यात डोंगर दऱ्यांमध्ये, जंगल परिसरात महूचे झाड आहेत. महू फुलांचा सुगंध परिसरात दरवळा असून, या फुलांचा वेचणीतून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत आहे.

पिंपळनेरच्या (Pimplner) पश्चिम पट्ट्यात व परिसरात महू फुलांचे हजारो झाडे आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर व खासगी जागेत महू फुलांचे झाडे आहेतय उन्हाळा सुरू झाल्याने पानगळ होऊन महू फुलांच्या झाडांना बहर येवू लागतो. साक्री तालुक्यातील पिंपळनेर च्या पश्चिम पट्टा महू फुलांनी बहरून गेला आहे. पश्चिम पट्ट्यात अनेक गावात महू फुले वेचणीचे काम सुरू असून, फुले विक्री (Flowers for sale) केली जातात. त्यात प्रामुख्याने मोहगाव, शेंदवड, चावडीपाडा, पिंपळपाडा, वडपाडा, केवडीपाडा, बारिपाडा, मोगरपाडा,मांजरी, वार्सा, सिताडी, काळांबा, धसकल, चोरवड, मळगाव, खरगाव, पारसरी, चरणमाळ, नांदरखी, बसरावळ, अशा अनेक गावांचा समावेश आहे. पहाटे महू फुलांची गळण होते. सकाळी सर्वत्र जंगल परिसरात महूफुलांच्या झाडांखाली महू फुले वेचणी करताना आदिवासी बांधव ठिक ठिकाणी दिसून येत आहेत. या महू फुलांचा वेचणीतून अनेकांना रोजगार मिळाला आहे.


अनेक आजारांवर गुणकारी
फुलांचा उपयोग केवळ मद्य बनविण्यासाठीच होतो असे नाही तर महू फुलांचे आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे महू फुलांचा भाजीसह खाद्यपदार्थ तसेच आजारांवर उपचारासाठी (treatment of diseases) उपयोगात येतात. आजारपणात तोंडाला चव यावी म्हणून उसळ खातात खोकला, पोटदुखी, आजारावर महू फुले गुणकारी आहेत, भाकरीच्या पिठात सुकलेली महू फुले टाकून खाल्यास शांत झोप येते. या महू फुलांच्या सेवनाने खोकलाही नष्ट होतो. एप्रिल महिना सुरू असल्याने तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. आयुर्वेदिक औषधी खाद्य तेलातही महूचा वापर केला जातो.

महुवृक्ष हा आदिवासी बांधवांसाठी कल्पवृक्षच आहे. त्यापासून फुले व फळांचे उत्पादन होते. सावली घनदाट, झाडाला आयुष्यही मोठे असते. तसेच या झाडांवर पक्षीसंख्याही खूप राहते.
- चैत्राम पवार, बारीपाडा, जि. धुळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT