Chhatrapati Sambhajinagar News: महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर तसेच लातूर परिमंडलात वीजबिल थकबाकी ही गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत या मार्च महिन्यात वीजबिल थकबाकी वसूल होणे आवश्यक आहे, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार यांनी दिले..छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर तसेच लातूर परिमंडलातील अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची तालेवार यांनी रविवारी (ता. ८) मंडल व विभागनिहाय आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य अभियंता पवनकुमार कछोट व अरविंद बुलबुले यांची उपस्थिती होती..Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र.संचालक तालेवार म्हणाले, की ग्राहकांना गतिमान सेवा व सुरळीत विद्युतपुरवठा करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. त्याबरोबरच वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली झालीच पाहिजे..Electricity Bill Recovery: कोल्हापूर परिमंडळात ६८ कोटींची वीजबिल थकबाकी.महावितरण ही सेवा देणारी सार्वजनिक सेवा कंपनी आहे. ग्राहकांना आपण जी वीज देतो, ती आपल्याला वीजनिर्मिती कंपन्यांकडून रोख खरेदी करावी लागते. त्यामुळे वीजबिलांचा ग्राहकांनी नियमित भरणा करावा, यावर कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. जे ग्राहक वीजबिलांचा भरणा करण्यास दाद देत नाहीत, त्यांचा विद्युतपुरवठा नियमानुसार खंडित झालाच पाहिजे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, वाहिनी विलगीकरण योजना व वीजगळती कमी करणे या योजनांचाही आढावा घेतला..अधिकाऱ्यांची कानउघाडणीमराठवाड्यात वीजबिलांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वसुलीसाठी व्यापक प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक ग्राहक वर्षानुवर्षे बिल न भरता वीज वापरत आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून अधिक काळ बिल न भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे वीजबिल वसुल झाले पाहिजे अथवा नियमानुसार वीजपुरवठा खंडित झाला पाहिजे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही काही ग्राहक अनधिकृतपणे वीज वापरतात का याची पडताळणी करावी. पडताळणीत वीजचोरी करताना ग्राहक आढळले तर त्यांच्यावर विद्युत कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देश तालेवार यांनी दिले..महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संचालक सचिन तालेवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) बीना सावंत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) शिल्पा काबरा, कार्यकारी अभियंता (चाचणी विभाग) प्रणिता भालेराव, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रेरणा बनकर, वरिष्ठ तंत्रज्ञ अश्विनी साळवे, तंत्रज्ञ दीपाली शिंदे, क्रांती म्हस्के, ज्योती होळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.