Flood situation in Marathwada Agrowon
ॲग्रो विशेष

Flood situation in Marathwada : मराठवाड्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे अजित पवार यांचे निर्देश

DCM Ajit Pawar : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून नांदेड, परभणी, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात सध्या पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी राज्य सरकारचे मराठवाड्यातील पुरस्थितीवर लक्ष असल्याचेही म्हटले आहे.

यवतमाळ, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुरस्थित निर्माण झाली आहे. पुरामुळे शेतीला फटका बसला असून पिके पाण्याली गेली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४ हजाराहून अधिक हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान घाटंजी तालुक्यात झाले आहे. घाटंजी तालुक्यापाठोपाठ बाभुलगाव, पुसद, राळेगावातही शेतीचे नुकसान झाले आहे. येथे कापूस, सोयाबीन, तूर पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.

मराठवाड्यात उद्भवलेल्या पुरस्थितीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्य सरकारचे लक्ष मराठवाड्यातील पुरस्थितीकडे असल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांशी सपर्कात असल्याचे अजित पवार यांनी म्हटेल आहे. तर पुरामुळे शेतकरी संकटात आला असून पूर ओसरताच पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व मंडलात अतिवृष्टी

मराठवाड्यात पावसाने कहर केला असून येथील ४२० महसूल मंडळांपैकी २४० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलात अतिवृष्टी झाली असून २ मंडलात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर २६ मंडलात १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात दाणादाण

अतिवृष्टीमुळे अर्ध्या मराठवाड्यात दाणादाण उडाली असून लातूर जिल्ह्यात एक जण पुरात वाहून गेला आहे. तर हिंगोलीत जिल्ह्यात पुरात अडकलेल्या २० शेतकऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तसेच २०० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे महामार्गावरची वाहतूक मंदावली असून जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारचे मराठवाड्यातील पुरस्थितीकडे लक्ष असून माझ्यासह मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. तर शेतीचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

परभणी जिल्ह्यातील ३१४ मिमी पाऊस

परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ५० मंडलात अतिवृष्टी झाली आहे. ३० मंडलामध्ये १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असून ५ मंडलात २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वालूर २४६, मानवत २५६, केकरजवळा २०७, रामपुरी २०३.८, बाभळगाव २७७ मिमी पाऊस झाला आहे. तर पाथरी मंडलात सर्वाधित पावसाची नोंद झाली असून येथे ३१४ मिमी पाऊस झाला आहे. तर १४ मंडलात ६५ मिमी पेक्षा जास्त झाला असून २ मंडलात ६५ मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT