Kolhapur Crop Damage agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Crop Damage : महापुराने ओला चारा कुजला; दूध व्यवसायावर परिणाम, शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलं

Flood Damage Crop : नदी काठावर असलेले गवती कुरण पूर्णपणे नष्ट झाले आहे तर उसात पाणी गेल्याने चिखल साचून राहिला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Milk Business : कोल्हापूर जिल्ह्यात शेतीबरोबर दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु मागच्या १५ दिवसात महापुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. नदी काठावर असलेले गवती कुरण पूर्णपणे नष्ट झाले आहे तर उसात पाणी गेल्याने चिखल साचून राहिला आहे. ओला चारा नसल्याने जनावरांना सकस आहार मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

नदीकाठच्या शिवारात साधारण २० दिवस साचून राहिलेल्या महापुराच्या पाण्यामुळे ऊस पिकाबरोबर अन्य पिके कुजून गेली आहेत. पिकांचा अक्षरशः चिखल झाला असल्याचे पूर ओसरल्यानंतर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जनावरांना ओल्या चाऱ्याअभावी दूध व्यवसायवरही परिणाम झाला आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

जिल्ह्यातील नद्यांना महापुराचे पाणी २० जुलैपासून शिवारात साचून राहिले होते. सध्या महापूर ओसरला तरी अजूनही काही ठिकाणी नदी पात्राबाहेर सखल भागात पाणी आहे. पिके तब्बल पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पाण्याखाली गेली होती. परिणामी, ही पिके सध्या कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे येथील पिके १०० टक्के कुजण्याची शक्यता असून, शासनाने पीक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

दरम्यान, अतिवृष्टीने पिकामध्ये पाणी साचून ओला चारा पूर्ण कुजला आहे. त्याचा परिणाम येथील दूध व्यवसायावर देखील झाला आहे. पुराच्या साठलेल्या पाण्यामुळे एकीकडे शेतीचे नुकसान आणि दुसरीकडे दूध व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Niphad Sugar Mill : ‘निसाका’चे भंगार विकून कोट्यवधींचा अपहार

Mosambi Disease: मोसंबी फळसड रोखण्याचे 3 सोपे उपाय

Nilanga Farmer Crisis : ‘कृषी’चा कारभार ‘रामभरोसे’

Cooperative Society : सोसायटी सचिवांचा तयार होणार आकृतिबंध

Rain Crop Damage : रात्रीतून व्हत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT