Flood Affected Agriculture agrowon
ॲग्रो विशेष

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers News : यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर व अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तर जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ८०५ शेतकरी बाधित झाले होते, त्यांना १२२ कोटी ४२ लाख ३७ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, शाहूवाडी, राधानगरी, कागल, चंदगड, पन्हाळा या तालुक्यांमध्ये महापुराचे तब्बल ८ दिवस पाणी राहिल्याने खरिपासह ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना शाससनाकडून नुकसानीबाबत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता. यामध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ८०५ शेतकऱ्यांचे ४७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता.

महिनाभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गाव निहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे.

शिरोळ आणि हातकणंगले महापुराच्या विळख्यात

शिरोळ तालुक्याला कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या महापुराने ४३ गावांना थेट फटका बसतो. शिरोळ तालुक्यात ४७ हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्र आहे यापैकी १० हजार २७९ हेक्टरहून अधिक पिकांना फटका बसला. ५२ पैकी ४३ गावातील २५ हजार शेतकऱ्यांचे ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, केळी ही हातातून गेली आहेत. सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी एका शिरोळ तालुक्याला २५ कोटी ६७ लाख रुपये मिळणार आहेत.

अशी मिळणार भरपाई

१ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिरायत पिकासाठी हेक्टरी १३,६०० रुपये, बागायतीसाठी २७,००० तर बहुवार्षिक पिकासाठी ३६,००० रुपयांची मदत दिली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू

Sugarcane Bill : दत्त साखर कारखाना मागील गळीत हंगामातील १०० प्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणार

SCROLL FOR NEXT