Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Disqualified : पाच लाख शेतकरी पीकविम्यातून अपात्र

Farmer Disqualified from Insurance : गेल्या वर्षी जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यातील केवळ सव्वातीन लाख शेतकरी पात्र ठरले, तर तब्बल पाच लाख शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र केली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : गेल्या वर्षी जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यातील केवळ सव्वातीन लाख शेतकरी पात्र ठरले, तर तब्बल पाच लाख शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र केली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी आठ लाख ४४ हजार ७५७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यातील अनेकांना प्रीमियम भरल्यानंतरही काहीच मिळाले नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यासाठी पीकविमा काढणारी कंपनी निश्‍चित केली आहे. तीन वर्षे ही कंपनी शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढणार आहे. गेल्या वर्षी आलेल्या अनुभवामुळे शेतकरी विमा कंपनीवर नाराज आहेत.

गेल्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली. यानंतर अवकाळी पावसाने फटका बसला. नुकसान झाल्यानंतरही पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तशा तक्रारी शेतकरी तसेच राजकीय पक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. मात्र यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

गेल्या वर्षी साडेआठ लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल पाच लाख शेतकऱ्यांच्या सूचना अपात्र केल्या आहेत. यामुळे नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले. शेतकऱ्यांच्या सूचना अपात्र करताना अनेक कारणे दिली गेली. यामुळे यंदा तरी मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.पात्र ठरलेल्या सूचनांपैकी अजूनही सहा हजार ५२९ शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, सातबारा दिला नसल्याचे कारण सांगितले जात आहे.

५१ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

गेल्या वर्षी नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. यामुळेच यंदा पीकविमा काढण्यासाठी आतापर्यंत ५१ हजार ९८५ शेतकऱ्यांनीच विमा उतरविला आहे. अर्जासाठी १५ जुलैची मुदत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT