Sugarcane Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Fire News : उरळगावात पाच एकर ऊस अज्ञाताने जाळला

Sugarcane Farming : शेतकरी पांडुरंग सात्रस यांचा कोळपे वस्ती हद्दीतील गट नंबर ४४९ मधील सुमारे अडीच एकर व भीमाजी कोळपे यांचा गट नंबर ७५२ मधील अडीच एकर असा एकूण ५ एकर ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Pune News : उरळगाव शिवारातील पाच एकर तोडणीसाठी तयार ऊस गुरुवारी (ता.२३) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने जळून खाक झाला.

शेतकरी पांडुरंग सात्रस यांचा कोळपे वस्ती हद्दीतील गट नंबर ४४९ मधील सुमारे अडीच एकर व भीमाजी कोळपे यांचा गट नंबर ७५२ मधील अडीच एकर असा एकूण ५ एकर ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, पांडुरंग सात्रस यांचा शेतकरी व इतर गावकरी धावल्याने त्यांचा या गटातील अडीच एकर ऊस व इतर शेतकऱ्यांचा आठ एकर असा एकूण दहा एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले.

सात्रस म्हणाले, ‘‘जळालेल्या उसाचे अंदाजे चार लाख रुपयांचे व उसा व्यतिरिक्त ठिबक सिंचन, पाइप, इतर साहित्य असे एकूण अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जळालेल्या उसाचा पंचनामा मंडल अधिकारी मनीषा खैरे व गावकामगार तलाठी टिळेकर यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २२ टक्के कपाशी क्षेत्र घटले

Cotton Disease : कपाशीवर वाढतोय टोबॅको स्ट्रीक विषाणूंचा प्रादुर्भाव

Wire Fencing Scheme: शेताला तार कुंपनासाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा शिवनेरीवर संकल्प; आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच

Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल

SCROLL FOR NEXT