Monsoon Fishing Ban Agrowon
ॲग्रो विशेष

Fishing Restriction : नव्वद दिवसांचीच मासेमारीबंदी हवी

Monsoon Fishing Ban : समुद्रातील मासळीच्या साठ्यात मुबलक वाढ होण्यासाठी मासेमारीबंदीचा कालावधी ९० दिवसांचा व्हावा, यासाठी मच्छीमार पुन्हा एकदा आग्रही झाले आहेत.

Team Agrowon

Palghar News : समुद्रातील मासळीच्या साठ्यात मुबलक वाढ होण्यासाठी मासेमारीबंदीचा कालावधी ९० दिवसांचा व्हावा, यासाठी मच्छीमार पुन्हा एकदा आग्रही झाले आहेत. या कालावधीवाढीसाठी गुजरात, महाराष्ट्रातील मच्छीमारांनी नुकतीच गुजरातच्या मत्स्योद्योग मंत्र्यांची भेट घेतली. मच्छीमार मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांची भेट घेणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी राज्यात १ जून ते ३१ जुलै असा ६० दिवसांचा करण्यात आला आहे. हा कालावधी १५ मे ते १५ ऑगस्ट असा ९० दिवसांचा असावा, यासाठी मच्छीमार आग्रह धरत आहेत; परंतु त्यांच्या मागणीबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमारांनी गेल्यावर्षी स्वत:हून मासेमारी बंदीचा कालावधी १५ दिवस वाढवून घेतला होता.

गेल्यावर्षी उत्तन, वसई आणि पालघरमधील मच्छीमारांच्या संघटना एकत्र येऊन त्यांनी मासेमारीची सुरुवात १ ऑगस्टपासून न करता १५ ऑगस्टपासून करण्याचा निर्णय स्वत:हून घेतला होता. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन मासळी साठ्यात लक्षणीय वाढ झाली, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

त्यामुळे सरकारने मासेमारी बंदीचा कालावधी ९० दिवसांचा करावा, यासाठी मच्छीमार यावर्षी पुन्हा प्रयत्न करत आहेत. अनियंत्रित, अनियमित, तसेच अशाश्वत मासेमारीमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासळी साठ्यात मोठ्या संख्येत घसरण होत आहे.

पावसाळ्यातील ९० दिवसांचा कालावधी हा मत्स्यबीजवाढीसाठी अत्यंत पोषक मानला जातो. या कालावधीत माशांची पूर्ण वाढ होऊन समुद्रातील मत्स्यसाठाही मुबलक होतो. या पार्श्वभूमीवर मासळीसाठ्यात वाढ होण्याकरिता इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने ८ एप्रिलला गुजरातचे मत्स्योद्योग मंत्री राघवजीभाई पटेल यांची भेट घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lakhpati Didi Yojana: ‘लखपती दीदी’ योजनेचा अमरावतीत बोलबाला; महिलांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ

Agriculture Innovation: ‘शेतकरी-शास्त्रज्ञांचा दुवा अधिक मजबूत करणारा उपक्रम’

Local Body Elections: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकांसाठी चुरशीने मतदान

Agrowon Podcast: सरकीचे दर टिकून; सोयाबीनमधील वाढ कायम, कापसात काहीसे चढ उतार, मका भाव दबावातच तर गव्हाचे दर टिकून

Cotton Prices: कापूस दरवाढीचा लाभ अल्प शेतकऱ्यांना

SCROLL FOR NEXT