CM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा

Politics Update: सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत आम्ही शेतकरीकेंद्रित ठेवून अनेक निर्णय घेतले.

Team Agrowon

Mumbai News: सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत आम्ही शेतकरीकेंद्रित ठेवून अनेक निर्णय घेतले. एक रुपयात पीकविमा, मोफत वीज, नमो शेतकरी महासन्मान योजना, सरकार आपल्या दारी योजना अशा अनेक योजना राबवून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केले. म्हणूनच आम्ही धाडसाने कार्यअहवाल काढू शकलो, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत केला.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत सरकारच्या कामांमुळे विरोधक धास्तावले असल्याची टीका केली. वानखेडे स्टेडिअममध्ये झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत राज्य सरकारने केलेल्या अडीच वर्षांच्या कामांचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले. यामध्येही महाविकास आघाडी सरकारच्या कामाची तुलना केली.

ज्यांचे गृहमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करणे हास्यास्पद असल्याची टीका फडणवीस यांनी केली. तसेच कोरोना काळात आरोपी सुखरूप घरी पोहोचले पाहिजेत यासाठी वाहनांची व्यवस्था करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असेही ते म्हणाले.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांतील महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकारच्या कामाची तुलना केली तर त्यांच्या नावावर अनेक वर्षांमध्ये सगळे प्रकल्प बंद पाडण्याचे पाप जाईल.

राज्यातील उद्योग कुणीही पळवले नाहीत मात्र, केवळ गुजरातच्या नावाने खडे फोडण्याचे काम सुरू आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले. एक रुपयांत पीकविमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, मोफत वीज अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकरी सशक्त करण्याचा प्रयत्न केला. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे आम्ही या योजना राबविल्या आहेत.

अजित पवार म्हणाले, की निवडणुका आल्या की नेहमी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले जातात. आधी का निर्णय घेतले जात नाहीत याला अर्थ नाही. विरोधकांनी आरोप करताना तारतम्य ठेवण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT