Chaknapur Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Chaknapur Dam : चणकापूरचे पहिले आवर्तन १५ जानेवारीनंतर

Water Storage : सध्या चणकापूरमध्ये दोन हजार ३५४ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. धरण ९७ टक्के भरले. मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावात ३८ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.

Team Agrowon

Malegaon News : तालुक्यासह ‘कसमादे’ परिसरात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. चणकापूर धरणावर मालेगावसह ‘कसमादे’तील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. दुष्काळी परिस्थिती असली, तरी यंदा चणकापूरसह विविध धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत.

सध्या चणकापूरमध्ये दोन हजार ३५४ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. धरण ९७ टक्के भरले. मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावात ३८ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. हे पाणी महिनाभर पुरेल.

इतर पाणीपुरवठा योजनांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे १५ जानेवारीनंतर चणकापूरचे पहिले आवर्तन सोडले जाण्याची शक्यता आहे. आवर्तनामुळे पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेल्या गावांना दिलासा मिळेल.

मालेगावला शहराला गिरणा व चणकापूर या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे येथे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचते. चणकापूर धरणातून गिरणा नदीद्वारे ठेंगोडा डावा कालव्यातून पाणी महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात येते.

तेथून जलवाहिनीद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येते. सद्यपरिस्थितीत ७० ते ७५ टक्के पाणी गिरणा धरणातून, तर २५ ते ३० टक्के पाणी तळवाडे तलावातून उचलले जात आहे. महापालिका हद्दीत ५४७ विभागाद्वारे दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरासह महापालिका हद्दीतील गावांना ५१ जलकुंभातून जलवाहिनीद्वारे पाणी वितरित केले जाते.

३१ जुलैपर्यंतचे नियोजन

उत्तर महाराष्ट्रात सर्वांत मोठे असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा ९ हजार ६४८ दशलक्ष घनफूट असून धरण ५२ टक्के भरले आहे. मालेगाव महापालिकेला पिण्यासाठी दरवर्षी साधारणपणे ९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असते. धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने आरक्षित पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत सहज पुरते.

मालेगाव शहर, दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजना आदींसह कसमादेतील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना चणकापूर धरण वरदान ठरले आहे. दरवर्षी पूर पाण्यामुळे फेब्रुवारीपर्यंत आवर्तनाची गरज भासत नव्हती.

यंदा परतीचा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही. परिणामी, कमी साठवण क्षमता असलेल्या काही पाणीपुरवठा योजनांनी डिसेंबरमध्ये ताण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आवर्तनाची मागणी होऊ लागली आहे. चणकापूरचे पिण्यासाठीचे पहिले आवर्तन १५ जानेवारीपर्यंत सोडले जाण्याची शक्यता आहे.

सिंचनासाठी आवर्तनाची अपेक्षा

चणकापूर धरणातून चार वर्षांपासून ‘कसमादे’तील शेतीला सिंचनासाठी आवर्तन मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा व फळ शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चणकापूरमधून सिंचनासाठी आवर्तनाबाबत स्पष्टता झाली नाही. मालेगाव महापालिकेने गिरणा धरणातून अधिक पाणी उचलावे.

तसेच, उन्हाळ कांदा व फळ शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हरणबारी धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने मिळणार आहेत. चणकापूरमधून पिण्यासाठी व सिंचनासाठी संयुक्त आवर्तन मिळाल्यास उन्हाळ कांद्याचे उत्पादन वाढू शकेल. शेततळे व विहिरींचे पाणी कितपत पुरेल, याबाबत साशंकता आहे. अनेक शेतकऱ्यांनी सिंचनासाठी आवर्तन मिळेल, या अपेक्षेने उन्हाळ कांदा लागवडीला सुरवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT