Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला रवाना

First lot of Hapus Mangoes Arrives : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग (ता. देवगड) येथील मिलेश बांदकर आणि करीम काझी या दोन बागायतदारांच्या बागांमधून आंबा पेटी वाशीला रवाना झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील आंबा बागायतदार मिलेश बांदकर आणि करीम काझी यांच्याकडील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला पाठविण्यात आली आहे. या हंगामातील सिंधुदुर्गातील ही पहिली पेटी आहे.

जिल्ह्यातील मोजकेच आंबा बागायतदार जुलै, ऑगस्टमध्ये आलेला मोहोर टिकविण्यासाठी प्रयत्न करतात. आकाराने लहान झाडांवर आच्छादन करून मोहोर टिकविला जातो. त्यासाठी फवारण्या देखील मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात. जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस असल्यामुळे मोहोर टिकविणे हे एक आव्हान बागायतदारांसमोर असते.

दरम्यान, यावर्षी विजयदुर्ग रामेश्वर घरीवाडी येथील मिलेश बांदकर आणि करीम काझी या दोन बागायतदारांनी जुलैअखेर आणि ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे संरक्षण केले. त्याला चांगली फळधारणा झाली. सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामध्ये देखील ही फळे टिकविण्यात या दोनही बागायतदारांना यश आले.

या दोनही बागायतदारांच्या बागांमधील आंबे आता परिपक्व झाले आहेत. या बागायतदारांनी पाडव्याच्या मुहूर्तावर सहा डझनाच्या एका पेटीचे पूजन करून ती वाशी बाजारपेठेत पाठविली आहे. श्री. बांदकर यांनी आच्छादन न करता आंबा उत्पादन घेतले आहे. त्यांच्या आंबा बागेत चार ते पाच पेटी हापूस आंबा असून तो येत्या आठवड्यात परिपक्व होईल.

दोन महिने अगोदरच पहिली पेटी

गेल्यावर्षी २५ जानेवारी २०२२ रोजी कातवण (ता. देवगड) येथील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांनी हापूसची पहिली पेटी सिंधुदुर्गातुन वाशी मार्केटला पाठविली होती. यावर्षी दोन महिने अगोदरच पेटी पाठविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT