E-Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : पीक पाहणीतील ३८ हजार शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य

Financial Assistance Scheme : मागील वर्षी चांदूररेल्वे तालुक्यातील पीकपाहणीवर नोंद केलेल्या ३७ हजार ९९२ सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या या अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

Team Agrowon

Amravati News : मागील वर्षी चांदूररेल्वे तालुक्यातील पीकपाहणीवर नोंद केलेल्या ३७ हजार ९९२ सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या या अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांनी झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा राज्य शासनाने २९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर केले आहे.

तसेच, २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी आपल्या पेऱ्याची नोंद ई-पीक पाहणीवर केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनाच ०.२० हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर ०.२० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.

ई-पीक नोंदणीनुसार शेतकरी संख्या

चांदूररेल्वे तालुक्यात गेल्या वर्षीचे ई-पीक पाहणीवर नोंद केलेले सोयाबीन पिकाचे १४ हजार ११ एवढे वैयक्तिक शेतकरी आहेत, तर १६ हजार ४५९ संयुक्त खातेदार शेतकरी आहेत. तसेच कापूस पिकाचे ३ हजार ४१५ वैयक्तिक खातेदार शेतकरी असून ४ हजार १०७ संयुक्त खातेदार शेतकरी आहेत.

ही कागदपत्रे सादर करावी लागणार

ई-पीक पाहणीवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेचे अर्थसाहाय्य मिळण्याकरिता वैयक्तिक शेतकऱ्यांना संमतिपत्र, बॅंक पासबुक, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व संयुक्त शेतकऱ्यांना ना-हरकत प्रमाणपत्रासह बँक पासबुक तसेच आधारकार्डची झेरॉक्स प्रत आपल्या गावातील कृषी सहायक यांच्याकडे सादर करायची आहे. या संदर्भात काही अडचण असल्यास त्यांनी त्वरित कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली

Hivare Bazar Village: हिवरे बाजारला ‘जल समृद्ध गाव’ पुरस्कार

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

SCROLL FOR NEXT