Kharip Paisewari Agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Paisewari : खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी पन्नासच्या आत

Farmer Issue : खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरीही विम्याचा पूर्ण लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था वाढत आहे.

Team Agrowon

Buldhana News : खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरीही विम्याचा पूर्ण लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था वाढत आहे. विमा कंपनी शेतकऱ्यांची अग्रिमवरच बोळवण करणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. अजूनही शेकडो शेतकरी अग्रिम लाभापासूनही वंचित आहेत.

सन २०२३-२४ च्या खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर पिकांची अंतिम पैसेवारी ३० डिसेंबरला जाहीर झाली आहे. जवळपास अडीच महिन्याचा कालावधी उलटला असला तरी अजूनही विम्याचा पूर्णपणे लाभ मिळालेला नाही. मागील महिन्यात २५ टक्के अग्रिम देण्यात आला आहे.

यामध्येही अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी अग्रिमपासून अजूनही वंचित आहेत. जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे आहेत. या सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी म्हणजे ४८ पैसे आलेली आहे.

या वर्षी पावसाळा तब्बल एक महिन्याने उशिरा सुरू झाला व त्यानंतरही पावसात खंड पडला. सोयाबीन या मुख्य पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनामध्ये घट आली. एकरी दोन ते चार क्विंटल सोयाबीनचा उतार आला. कृषी विभागाच्या आवाहनामुळे तसेच शासनाकडून एक रुपयात विमा दिल्यामुळे जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्यास पीक विमा व दुष्काळग्रस्तांसाठीच्या सर्व सवलती लागू होतात. पीकविमा, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमी योजनांच्या कामाच्या निकषात

शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे टँकर इत्यादी सवलती दिल्या जातात. जिल्ह्यातील सर्वच मंडळाची अंतिम पैसेवारी ३० डिसेंबरला जाहीर झाली आहे. जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४८ असून रिसोड, मंगरूळपीर व कारंजा या तालुक्यांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे. जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी विम्यासह इतर सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT