Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आधारित सिनेमा येणार; गौतमी पाटील दिसणार मुख्य भूमिकेत

Ladki Bahin Scheme : महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना म्हणून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चं नाव घेतलं जातं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. या योजनेचा सकारात्मक परिणाम सिनेमातून दाखवला जाणार आहे.

Dhananjay Sanap

Maharashtra government Scheme : लवकरच लाडकी बहीण योजनेवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नृत्यांगणा गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक सिनेमात प्रमुख पात्र साकारणार आहेत. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर आधारलेली कथा असणार आहे. नुकताच सातारा येथे सिनेमाचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.

महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना म्हणून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चं नाव घेतलं जातं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. या योजनेचा सकारात्मक परिणाम सिनेमातून दाखवला जाणार आहे.

लाडकी बहीण' या सिनेमाची कथा वास्तव आणि मनोरंजनावर आधारलेली आहे. या सिनेमाची निर्मिती ओम आई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. तर शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर गणेश शिंदे यांचं दिग्दर्शन असून पटकथा व संवाद लेखन शितल शिंदे यांनी केलं आहे.

लाडकी बहीण योजनेचा फायदा लाखो महिलांनी घेतला. त्यामुळे गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य आलं. त्यामुळे एक गंभीर विषय समाजासाठी हलक्याफुलक्या शैलीत मांडत प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर उभार केली जाणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.

महायुती सरकारला लाडक्या बहीण योजनेनं विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिलं. राज्यातील २.५० कोटी महिलांना या योजनेतून दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात आले. त्यासाठी ४६ हजार कोटींचा खर्च करण्यात आला. तर विधानसभा निवडणुकीनंतर योजनेचा हप्ता २ हजार १०० करू असं आश्वासन महायुती सरकारने दिलं. परंतु अद्यापही वाढीव हप्त्याची लाडक्या बहीणींना प्रतीक्षा लागलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT