Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य, केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा

Complaints Against Governments : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळतो, ही घटना अत्यंत लाजीरवाणी असून, छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे.

Team Agrowon

Mumbai News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळतो, ही घटना अत्यंत लाजीरवाणी असून, छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे. घाई-गडबडीत पुतळा उभा केल्याप्रकरणी केवळ ठेकेदार, अधिकाऱ्यांवर नव्हे तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी मंगळवारी केली.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर गुन्हा दाखल केला. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारमधील मंत्री आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. महाराष्ट्रातील युती सरकार हे कमिशनखोर आहे. हे सरकार सिमेंट, वाळू, विटा, लोखंड यातही कमिशन खाते, त्यांना कशाचीच लाज वाटत नाही. शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम ठाण्यातील नवखा, अनुभव नसलेला शिल्पकार आपटे याला दिले. या कामावर २.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर ५ कोटी रुपये सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात आले. वास्तविक पाहता छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तीला दिले पाहिजे होते.

...हीच भाजपची मानसिकता’

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराजांचे नाव घेऊन मते मिळवण्यासाठी घाई-गडबडीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्‍घाटन करण्यात आले होते. मोदी यांच्या हस्ते संसदेचे उद्‍घाटन केले त्या वास्तूला गळती लागली, अयोध्येतील राम मंदिराचे उद्‍घाटन केले, मंदिराला गळती लागली, समृद्धी महामार्गाचे उद्‍घाटन केले, त्याला भेगा पडल्या, हा नरेंद्र मोदींचा हातगुण म्हणायचे की काय असा प्रश्‍न पडतो. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी शिवाजी महाराज हे जुने आदर्श, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नवे आदर्श आहेत, असे म्हणत नितीन गडकरींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अपमान करणे हीच भाजपची मानसिकता आहे, असेही ते म्हणाले.

‘राष्ट्रवादी’चे आज आंदोलन

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर झालेल्या शिवराय पुतळा दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज (ता. २८) घटनास्थळी जाणार आहेत. तसेच याविरोधात शरद पवार गट घटनास्थळी सकाळी ११ वाजता आंदोलन करणार आहे. या संदर्भात पत्रकात म्हटले आहे, की या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे.=

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2024 : आज संसदेचे हिवाळी अधिवेशन; अदानी प्रकरण आणि वक्फ विधेयकामुळे तापमान वाढणार?

Onion Crop : आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

Livestock Market : आळेफाटा येथे गाईंच्या बाजारात ५४ लाखांची उलाढाल

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

SCROLL FOR NEXT