Fig Orchards  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : दुष्काळाच्या दाहकतेने अंजीर बागा धोक्यात

Fig Orchards : पुरंदर तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने विहिरी, नाले, ओढे, तळी कोरडी पडली आहेत.

Team Agrowon

Pune News : पुरंदर तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने विहिरी, नाले, ओढे, तळी कोरडी पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याअभावी बहुतेक ठिकाणी पिके करपली आहेत. पशुधनासाठी चारा, पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, अंजिरासह सीताफळ बागा धोक्यात आल्या आहेत.

या बागा वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, बागा वाचविण्यासाठी खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तर २३२ गावाखेडी वाड्या वस्त्यांवर ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे प्रशासनाकडे टँकरची मागणी जोर धरत आहे. सध्या तालुक्यातील ३२ गावे आणि २३२ वाड्यावस्त्यांवरील ६६ हजार ५०२ नागरिकांना ५० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहेस, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

बागा जळताना पाहून काळीज तुटते

दुष्काळामुळे अंजीर बागा जळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दहा वर्षे शेतकऱ्यांनी बागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून जगवल्या आहेत. पण सध्या दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह असल्यामुळे या बागा डोळ्यासमोर जळताना पाहून काळीज तुटते आहे.

अंजिराच्या आता खरा मोसम असून, पाण्याअभावी बागा जळाल्यामुळे एकरी दहा-बारा लाख रुपयांचे प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, अशी व्यथा अंजीर उत्पादनात पुरस्कार मिळवलेले सोमुर्डीचे शेतकरी बाबा पवार यांनी व्यक्त केली.

पुरंदर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या गावांना टँकर हवे असतील त्यांनी प्रस्ताव द्यावेत. तसेच काही समाजसेवी आणि खासगी संस्था पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवू इच्छित असतील, तर त्यांनी पंचायत समिती किंवा प्रांताधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून नागरिकांना मदत करावी.
- डॉ. अमिता पवार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT