Orange Orchard Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Orchard Water Management : संत्रा बागांमध्ये खत-पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

दर्जेदार संत्रा उत्पादकतेत योग्य जमिनीची निवड त्यासोबतच खत, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

Wardha News : दर्जेदार संत्रा उत्पादकतेत योग्य जमिनीची निवड त्यासोबतच खत, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शिफारसीत पद्धतीने नुसार हे तंत्र स्वीकारले तर गुणवत्तापूर्ण संत्रा उत्पादन शक्य असल्याचे मत संत्रा पीकतज्ज्ञ जनार्दन ब्राह्मणे यांनी व्यक्त केले.

सत्तरपूर येथे सकाळ समूहाच्या ‘ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. ब्राह्मणे पुढे बोलताना म्हणाले, ‘‘संत्रा आंबिया बहाराचे नियोजन करताना संत्रा पिकाला लागणारी योग्य जमीन, मातृ वृक्षांची निवड करावी.

घरी गांडूळ खत व सेंद्रिय खताचे उत्पादन करीत त्या माध्यमातून जमिनीच्या आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा. परिपक्व अवस्थेपर्यंत चार टप्प्यांत खतांची शिफारस त्यांनी केली. पाणी व बुरशीजन्य रोगाचे व्यवस्थापन तसेच उत्कृष्ट दर्जाची फळे कशी तयार करावीत याविषयीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी माहिती दिली.

विपुल चौधरी यांनी संत्रा पिकाला जमीन व झाडांचे खोड या दोन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे. डिसेंबर महिन्यामध्ये पाणी लावण्याच्या आधी प्रति झाड पाच किलो कुजलेले शेणखत सोबत १४ टक्के ऑरगॅनिक कार्बन व निंबोळी टाकावे.

वातावरणामुळे तापमानामध्ये वाढ असताना फळे हे पिवळी होऊन गळतात. त्यामुळे तेथे प्रति झाड फ्रेश सिलिकॉन न्युअल फॉर्ममध्ये द्यावे. ते सिलिकॉन हे जमिनीला पूर्णता कोटिंग करते व तापमान नियंत्रित ठेवते. झाडाला फ्रेश सिलिकॉन द्यावे.

लिक्विड धान सिलिकॉन फायद्याचे असते. यामुळे फळाला तापमानाचा फटका बसणार नाही व फळगळ होणार नाही,’’ असे विपुल चौधरी यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकरी प्रवीण वाघमारे यांनी संत्रा पिकाबाबत उत्पादनवाढीचे अनुभव कथन केले. जीबी ॲग्रो इंडस्ट्रीजचे रवी अरडक यांनी विविध उत्पादनाबाबत माहिती दिली.

या वेळी जयंतराव निंभोरकर, सोनोने, रवींद्र पाटने, सुरेश गांजरे, संजय वडसकर, मंगेश अग्रवाल, पंकज गांजरे, भूषण इंगोले, रामदास लेंडे, गोवर्धन पोटे, मनोज काळे, ज्ञानेश्वर वर्धापूरकर, रमेश पापडकर, सुनील लव्हेकर उपस्थित होते.

जीबी ॲग्रोच्या वतीने निखील गुडधे, उजेर शहा, अभिजीत ठाकरे उपस्थित होते. ‘ॲग्रोवन’चे वितरण सह व्यवस्थापक सुनील धांडे यांनी प्रास्ताविक केले. ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी सचिन शेगोकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Punjab Flood Funds: पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मदतनिधीवरुन कलगीतुरा

Cotton Ginning Factory: जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा

Onion Farmers: नाफेड, एनसीसीएफकडील कांदा देशात विकल्यास ते ट्रक पेटवू

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’च्या भूसंपादनासाठी बार्शीत प्रशासनाची दडपशाही

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

SCROLL FOR NEXT