Fertilizer
Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Sales : देशातील खतांची विक्री २६ टक्क्यांनी घटली

Team Agrowon

Fertilizer Supply : देशात यंदा खतांची उपलब्धता पुरेशी असल्याचे सरकार वारंवार सांगत आहेत. युरिया आणि डिएपीची उपलब्धता अधिक असल्याने शेतकऱ्यांना टंचाई होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांची आगाऊ खेरदी कमी केली. परिणामी एप्रिल मधील खत विक्री कमी झाली.

देशातील खत उत्पादनात एप्रिल महिन्यात जवळपास २६ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात देशातील युरिया उत्पादन २३ लाख ४५ हजार टनांवर पोचले आहे. देशातील बंद असलेले युरिया प्लांट्स सुरु झाल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. गोरखपूर, सिंद्री, बारौनी आणि रामागुंडम हे चार प्लाट्स पुन्हा सुरु झाले आहेत.

एप्रिल महिन्यातील युरियाची विक्री मागील एप्रिलच्या तुलनेत कमी झाली. युरिया विक्री जवळपास १२ लाख टनांवर पोचली होती. यामुळे यंदा शेतकऱ्यांना खत टंचाईची शक्यता दिसत नसल्याचे स्पष्ट होते. युरियाची उपलब्धता कधीही होऊ शकते, याचा अंदाज शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील युरियाची विक्री यंदा कमी झाली.

देशातील डीएपी उत्पादनही १० टक्क्यांनी वाढले आहे. देशात एप्रिल महिन्यातील डीएपी उत्पादन जवळपास ४ लाख टन झाले. तर मागील हंगामातील एप्रिल महिन्यात युरियाची विक्री ३ लाख ३५ हजार टनांवर झाली होती. तर डीएपीची आयात मागील एप्रिलच्या ४ लाख १० हजार टनांवरून यंदा ४ लाख ५४ हजार टनांवर पोचली. तर युरिया आयातही ९ टक्क्यांनी वाढून जवळपास ३ लाख टनांवर पोचली आहे.

हंगामाच्या तोंडावर शेतकरी युरिया आणि डीएपीची खरेदी करत असतात. यंदा या दोन्ही खतांची उपलब्धता पुरेशी असल्याची ग्वाही सरकारने दिली आहे. त्यामुळे सध्या युरिया आणि डिएपीची विक्री सरासरी होत आहे. तसेच खत विक्रीसाठी देशपातळीवर भारत हा एकच ब्रॅन्ड ठेवल्याने कंपन्यांची स्पर्धाही कमी झाली.

एप्रिल महिन्यात खतांची विक्री १८ टक्क्यांनी कमी झाली. पण डीएपीच्या एमओपीच्या विक्रीत ४ टक्क्यांनी सुधारणा झाली. एमओपीची विक्री २ लाख ९० हजार टनांवरून ३ लाख २ हजार टनांवर पोचली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावावरील दबाव कायम; कापूस, सोयाबीन, तूर तसेच कांदा यांचे बाजारभाव काय आहेत ?

Sugar Production : साखर उत्पादन वाढले पाच लाख टनांनी, उतारा मात्र घटला

Electricity Issue : नियमित विजेची नागरिकांची मागणी

Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

SCROLL FOR NEXT