Latur News : आंबा फळपिकात मोहर निर्मिती गुंतागुंतीची असते. अनेक घटकांचा समन्वय साधून मोहोर बाहेर पडतो. याकरिता मोहर निर्मितीस चालना देणेकरिता पाण्याचा ताण देणे अत्यावश्यक, असल्याचे प्रतिपादन हिमायतबाग येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रकल्प अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले..महाराष्ट्र ॲग्री बिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. ९) कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात आयोजित आंबा-उत्तम कृषी पद्यती प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. .Mango Farming : आंब्याच्या योग्य व्यवस्थानासह मार्केटिंगचाही अभ्यास करा.या वेळी व्यासपीठावर मॅग्नेटचे प्रकल्प अधिकारी गणेश पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एस. डिग्रसे, तालुका कृषी अधिकारी (लातूर) पी. डी. राठोड, उद्यानविद्यावेत्ता डॉ. पी. एच. उलेमाले, विषय विशेषज्ञ डॉ. सतीश बेदरे आदींची उपस्थिती होती. .या वेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, की ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अडीच ते तीन महिने आंबा बागेला चांगला ताण बसायला हवा. तो जमिनीच्या प्रतीनुसार असावा. मोहर फुटून बाजरीच्या आकाराचे फळ येईपर्यंत बागा तानावरच असाव्या. आपणास आंबा उत्पादकता वाढविण्यासाठी भरपूर वाव आहे. .Kesar Mango Farming : लवकरच केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे बळकटीकरण.आंबा बागेची शास्रीय पद्धतीने मशागत करणे, अतिघन लागवडीत दरवर्षी छाटणी करणे, जास्तीच्या फांद्याची -पालवीची विरळणी, फळे काढणीनंतर हाताळणी सुविधा वापरणे, बागेत भरपूर हवा अन सूर्यप्रकाश मिळण्यासाठी डोअर विंडो पद्धतीचा वापर केल्यास आपली उत्पादकता हमखास वाढू शकते, असा आशावाद डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. .आंबा फळांच्या मध्य फांदीची ऑक्टोबरमध्ये छाटणी केल्यास झाडास ताण मिळून आंबा पिकास अधिक मोहोर येतो. दरवर्षी मोहर निर्मिती चांगली होण्यासाठी आंबा बागेत वाढ उत्तेजक व वाढ रोधक संजीवकांचा समतोल साधला गेल्यास हमखास मोहर येऊन चांगली फळधारणा होत, असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी आंबा उत्पादक प्रभाकर मुळे, रमेश जावळे, वैजनाथ नाबदे, शरद शिरसाट, रमेश टेकाळे, प्रल्हाद हिंगमिरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.