Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Suagrcane Season : सीमा भागातील ऊस कर्नाटकात जाण्याची भीती; कोल्हापूर विभागातील गळीत हंगामावर परिणाम

Karnataka Sugarcane Season : महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील हंगामही १५ नोव्हेंबरपासूनच सुरू झाला; पण तत्पूर्वीच सीमा भागातील काही कारखाने सुरू झाले आहेत.

sandeep Shirguppe

Sugarcane Season Maharashtra : यंदाच्या २०२४ -२५ हंगामासाठी कारखान्यांचे बॉयलर पेटले. अनेकांनी मुहूर्तावर मोळीही टाकली, पण अद्याप बहुंताश कारखान्यांची तोडणी यंत्रणाच न आल्याने कोल्हापुरातील हंगाम अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेक साखर कारखानदारच निवडणुकीच्या फडात अडकले आहेत. परिणामी सीमा भागातील ऊस कर्नाटकात जाण्याची भीती आहे.

दरम्यान, काही खासगी कारखान्यांचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे. सहकारी तत्त्वावरील काही कारखाने सुरू झाले असले तरी त्याला म्हणावा तसा वेग दिसत नाही. यावर्षीचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण, याच दरम्यान राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. त्यात बहुंताश कारखानदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. कारखान्यांतील अनेक कर्मचारी नेत्यांच्या प्रचारात व्यस्त आहेत.

हंगामपूर्व कारखान्याची देखभाल- दुरुस्ती जरी झाली असली तरी प्रत्यक्ष कारखाने अजून सुरू झालेले नाहीत. सर्वच कारखान्यांनी बॉयलर पेटवले, काहींनी मुहूर्तावर मोळीही टाकली; पण अजून प्रत्यक्ष हंगाम सुरू व्हायला नोव्‍हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडणार आहे.

ऊस पिके जोमात आहेत. जेमतेम पाऊस झाल्याने उसाचे वजनही चांगले भरण्याची शक्यता आहे. महापूर आला पण पुराचे पाणी जास्त दिवस नदीकाठच्या ऊस पिकांत राहिले नाही. त्यामुळे ऊस पीक चांगले आले आहे; पण हंगाम लवकर सुरू झाला तर आताचे पीक घालवून नवे पीक घेण्याचे शेतकऱ्यांचे मनसुबे हंगाम लांबल्याने धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

यावर्षी महाराष्ट्रात येणारी किमान ३० ते ३५ टक्के तोडणी यंत्रणा अन्य राज्यांत गेली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे या टोळ्यांनी अन्य राज्यात जाणे पसंत केले आहे, तर बीड, उस्मानाबाद, जालना, लातूर व नांदेड भागातून येणाऱ्या टोळ्या स्थानिक राजकारण्यांनी अडवून ठेवल्या आहेत. या टोळ्या गेल्या तर त्याचा मतदानांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांना काहीतरी आमिष दाखवून रोखून धरले आहे. यापैकी ५० ते ६५ टक्के टोळ्यादाखल झाल्या; पण कारखानदारांनी त्यांना अजून तोडीचे नियोजन दिलेले नाही. काही कारखाने १९ नोव्हेंबरपासून तोडी देण्याच्या तयारीत आहेत.

कर्नाटकात हंगाम जोरात

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील हंगामही १५ नोव्हेंबरपासूनच सुरू झाला; पण तत्पूर्वीच सीमा भागातील काही कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांकडून जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले व अन्य तालुक्यांतील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. उसाचे क्षेत्र रिकामे होत असेल तर शेतकरीही कर्नाटकात ऊस घालवण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: देशात आर्थिक संकटाचं वादळ येतंय, शेतकऱ्यांना झळ बसणार, राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

Farmer Protest: जामसंडेत आंबा-काजू बागायतदारांचे आंदोलन

Agricultural Awareness Program: सोनवळा येथे विज्ञानाधारित निविष्ठा जागरूकता कार्यक्रम

Wedding Book Gifting: फेट्यांच्या मानपानाऐवजी पुस्तकरूपी भेट

Nutrient Management: शास्त्रोक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन काळाची गरज : तांबडे

SCROLL FOR NEXT