Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : उरणमध्ये भातशेती ओसाड पडण्याची भीती

Barren Land : अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाताची रोपे पाण्याखाली आल्याने अक्षरशः कुजूली आहेत.

Team Agrowon

Uran News : अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाताची रोपे पाण्याखाली आल्याने अक्षरशः कुजूली आहेत. आता तिबार पेरणीलाही अवधी नसल्याने भातशेती ओसाड पडण्याची भीती आहे. त्यामुळे येथील बळीराजा संकटात सापडला असून येत्या काळात उपासमारीची वेळ येण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

सलग सहा दिवस उरण तालुक्याला पावसाने झोडपले आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्यातील पूर्व विभागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील अनेकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, बोरखार, धाकटी जुई, टाकीगाव, विंधणे, दिघोडे, आवरे, गोवठणे, पाले, पिरकोन, खोपटे, चाणजे, नागाव, केगाव आदी भागातील काही शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटून पाणी भातशेतीत घुसले आहे.

रोपांवर गाळ, कचरा

पुराच्या पाण्यासह चिखल-गाळ, काडीकचरा भातावर पडल्यामुळे संपूर्ण पीक कुजून गेले आहे. शेतात गाळ साचल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने भातपिकाचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सलग सहा ते सात दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे लागवड करण्यात आलेल्या भातशेतीत गाळासह पाणी घुसल्याने भाताची रोपे कुजली आहेत. मजुरांचा आणि रासायनिक खताचा खर्च वाया गेला असून मेहनतही वाया गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीची मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.
- बाळकृष्ण पाटील, शेतकरी, कळंबुसरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT