Solapur News : मोडनिंब येथे बुधवारी (ता. २५) सायंकाळी पावसाने तुफान बॅटिंग केली. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या पावसाने अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. मंडलातील बावी, वडाचीवाडी परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला.
पर्जन्यमापक यंत्रात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद होणे अपेक्षित असताना, मोडनिंब महसूल मंडलाचे पर्जन्यमापक यंत्रात, या यंत्रात केवळ ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, शेजारच्या मंडलात मात्र ६५ पंक्षा जास्त म्हणजे ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पर्जन्य मापकामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची नेमकी मोजदाद होत नाही.
बुधवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस मध्यरात्रीपर्यंत अविरत कोसळत होता. कमी जास्त प्रमाणात सुमारे सात तास सलग पावसाने हजेरी लावली. मोडनिंब मंडलातील मोडनिंबसह सोलंकरवाडी, बावी, जाधववाडी, बैरागवाडी, अरण, तुळशी, रोपळे, वडाची वाडी या सर्वही गावात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला.
विशेषता बावी, वडाचीवाडी परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस कोसळला. परंतु अतिवृष्टीची नोंद होण्यासाठी पर्जन्यमापकात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद होणे आवश्यक आहे. मोडनिंब महसूल मंडलाचे पर्जन्यमापक यंत्र मोडनिंब येथे बसविण्यात आले आहे. मोडनिंब येथील पर्जन्यमापक यंत्रापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेटफळ (ता. मोहोळ) येथील पर्जन्यमापक यंत्रात याच पावसाची नोंद ९२ मिलिमीटर झाली आहे.
मोडनिंब येथील या नोंदीचा फटका या पर्जन्यमापकापासून दूर असलेल्या बावी, वडाचीवाडी, रोपळे या गावांना बसणार आहे. यामुळे मका, कांदा, उडीद, टोमॅटो व भाजीपाला पाण्याखाली गेली तर द्राक्ष बागांतून विद्युत पंपाद्वारे पाणी काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
आमदार शिंदेंकडून नुकसानीची पाहणी
आमदार बबनराव शिंदे यांनी बावी परिसरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ते म्हणाले, म्हैसगाव, दारफळ येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोडनिंब मंडलात बावी, रोपळे, वडाचीवाडी परिसरात प्रचंड पाऊस होऊनही मोडनिंब येथील पर्जन्यमापक यंत्रात कमी नोंद झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. याबाबत मार्ग काढण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.