Pune News : धरणक्षेत्रात पावसाच्या जोर असला तरी अधूनमधून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. त्यापैकी २० धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
पावसाचे जवळपास चार महिने झाले आहेत. या काळात शिरगाव, कोयना, डुंगरवाडी, ताम्हिणी या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडला आहे. एक जूनपासून ते २७ सप्टेंबर या कालावधीत मुळशी घाटमाथ्यावर सर्वाधिक ७ हजार ३३ मिलिमीटर पाऊस पडला. तर लोणावळा घाटमाथ्यावर ५ हजार २०६ मिलिमीटर, वळवण ४ हजार ७२२, कुंडली ३ हजार ७३८, शिरोटा ३ हजार ७११, ठोकरवाडी दोन हजार ९८८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुळशी, आंध्रा वळवण, लोणावळा या धरणांत जवळपास ५५.१० टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे.
शुक्रवारी (ता.२७) सकाळी मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पाऊस पडला. तर मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरण क्षेत्रांतही चांगला पाऊस झाला आहे. या धरणांत आत्तापर्यंत एकूण ८५.७२ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. खडकवासला धरणांतून डाव्या, उजव्या कालव्याला आणि सांडव्याला ५ हजार ४७७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून उजनीतूनही विसर्ग सोडण्यात आला आहे.
नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणक्षेत्रांत कमी-अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला असल्याने चासकमान, शेटफळ, वडिवळे, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे.
...या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू
टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, चासकमान, कळमोडी, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.