Ajit Pawar's Mother Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : एक हजार ९३२ ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य मतपेटीत

Pune Local Body Election : जानेवारी ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायती व १४२ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी (ता. ५) शांततेत मतदान झाले. ८४९ सदस्यांची, तसेच ४९ सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे.

गणेश कोरे

Pune News : जानेवारी ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायती व १४२ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी (ता. ५) शांततेत मतदान झाले.

८४९ सदस्यांची, तसेच ४९ सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे १८४ ग्रामपंचायतींमधील १ हजार १३२ सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

निवडणूक प्रक्रियेनुसार जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतींमधील २ हजार ४० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार होती. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीनंतर एकच अर्ज आल्याने ८४९ सदस्यांची निवड बिनविरोध झाली.

त्यामुळे १८४ ग्रामपंचायतींमधील १ हजार १३२ सदस्यांची निवड मतदारानंतर निश्चित होईल. तर ५९ सदस्य पदांसाठी एकही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहतील. त्यात सर्वाधिक २४ जागा आंबेगाव तालुक्यातील आहेत. भोर तालुक्यात १७, तर मुळशी तालुक्यातील ९ सदस्यपदे रिक्त राहातील.

जुन्नर तालुक्यात अग्रेसर असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्री मुक्ताई- हनुमान ग्रामविकास हा सत्ताधारी पॅनल व श्री मुक्ताई - हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेल यांच्यातच दुरंगी, अटीतटीचा सामना रंगला.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १६ हजार ८५९ पैकी ९ हजार ४९१ मतदारांनी (५६.२९ टक्के ) मतदानाचा हक्क बजावला. आज (ता. ६) सकाळी दहा वाजता जुन्नर येथे मतमोजणी होईल.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पारगाव, अवसरी बुद्रुक, पहाडदरा, लोणी, मांदळेवाडी व पोंदेवाडी या ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्क्यापर्यंत मतदान झाले. काही गावात एकास एक उमेदवार असल्याने चुरशीने मतदान झाले. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील टाव्हरेवाडी, जारकरवाडी, वाळुंजनगर येथील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी बिनविरोध निवडणूक झाली आहे.

लोणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे. सदस्यपदाच्या एकूण नऊ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वसाधारण महिलेच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहे. पहाडदरा येथील सरपंच बिनविरोध निवडून आले असून सदस्य पदाच्या दोन जागांसाठी मतदान होत आहे तर दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

मेडद (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत परस्परविरोधी काम केल्याच्या कारणावरून माजी सरपंच, सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. शनिवारी ( ता. ४) रोजी रात्री ही घटना घडली.

माळेगाव पोलिस ठाण्यात जखमींच्या परस्परविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तब्बल २४ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करत काहींना अटक केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक देविदास साळवे यांनी दिली.

खुटबाव, पारगाव, खोपोडीमध्ये, यवत (ता. दौंड) येथे सरपंच पदासाठी सुरस असल्याने एका एका मतासाठी धावपळ झाली. पारगाव येथे सायंकाळी चार वाजता सरासरी मतदान ८० टक्क्या पेक्षा जास्त झाले होते.

खोपोडी येथे सरासरी मतदान ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाले. चाकण (ता. खेड) परिसरातील शेलपिंपळगाव, वाकी बुद्रुक, भाम संतोष नगर येथील ग्रामपंचायतींत दुपारी तीनपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले होते. चाकण परिसरातील ग्रामपंचायतींचे मतदान सुमारे ९० ते ९५ टक्के होईल, असा अंदाज शेलपिंपळगाव ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी माणिक गायकवाड यांनी व्यक्त केला.

‘माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे’

‘‘माझे वय आता ८६ आहे. त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे. मात्र पुढचे काय सांगावे,’’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी भावना व्यक्त केली. काटेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत आशा पवार व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानाचा हक्त बजावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT