Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी आज होणार मतदान

Pune Local Body Election : गावखेड्यांचा कारभारी होण्यासाठी गेले पंधरा दिवस जिल्ह्याच्या विविध गाव, वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज, रविवारी (ता.५) मतदान होत आहे.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune News : गावखेड्यांचा कारभारी होण्यासाठी गेले पंधरा दिवस जिल्ह्याच्या विविध गाव, वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज, रविवारी (ता.५) मतदान होत आहे.

या निवडणुकांसाठी सुरू असलेला प्रचारांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि तोफा शनिवारी (ता.४) सायंकाळी थंडावल्या.

गेल्या १० दिवसांपासून गाव पुढाऱ्यासह, कार्यकर्ते आणि उमेदवारांनी जोरदार प्रचार करत आपापली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या प्रचारानंतर आता मतदान होऊन, गावपुढाऱ्यांची निवड होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये ओळखली जाणारी नारायणगाव (ता. जुन्नर) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावातील काटेवाडी येथील निवडणुकांमध्ये रंगत आणली आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सक्रिय सहभागाने रंगत आणली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत पॅनेल विरुद्ध भाजप पुरस्कृत पॅनेल अशी लढत होत आहे. अजित पवार यांचे गावच काबीज करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.

Election
Gram Panchayat Election : जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल

तर, नारायणगाव ग्रामपंचायीमध्ये मावळते लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांनी संतोषनाना खैरे आणि सूरज वाजगे यांची मोट बांधत मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत आहेत. तर, त्यांच्या विरोधात युवा नेते अमित बेनके आणि सुजित खैरे यांनी श्री मुक्ताई ग्रामविकास परिवर्तन पॅनेलद्वारे आव्हान उभे केले आहे. दोन्ही पॅनेलने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत विजयाचे दावे केले आहेत.

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी निवडणुकीला राजकीय पक्षाचे स्वरूप न देता आणि तालुक्यातील राजकीय गट-गटाचे स्वरूप न देता स्थानिक पातळीवर राजकीय हीतत न साधण्यासाठी पक्षिय व तालुकास्तरीय राजकीय मतभेद बाजूला ठेवले आहेत.

वाटलूज ग्रामपंचायत बिनविरोध

दौंड तालुक्यातील निवडणुका घोषित झालेल्या अकरा ग्रामपंचायतींपैकी वाटलूज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतीच्या ८८ जागांसाठी एकूण २२३ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे व नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

Election
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नऊ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध

त्यापैकी वाटलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासह सर्व सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वर्चस्वासाठी गावकारभाऱ्यांनी कंबर कसली आहे.

सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सरपंचपदासाठी पंचरंगी लढत होत आहे. ग्रामविकास पॅनेल व बहुजन ग्रामविकास पॅनेल या दोन पॅनेलमध्ये लढत होत असून, काही अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

पानवली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुका लागलेल्या एकूण ८८ जागांसाठी २२३ उमेदवार रिंगणात आहेत. तर, सरपंचपदासाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकूण ५० मतदानकेंद्रे निश्चित केली आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार ममता भंडारे यांनी दिली.

दोन उद्योजकांच्या पत्नींमुळे रंगत

राजुरी (ता. पुरंदर) येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत गावातील दोन उद्योजकांच्या पत्नी मैदानात उतरल्याने निवडणूक मोठी अटीतटीची झाली असून, काँटे की टक्कर पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

राजुरी येथील सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सरपंचपदासाठी माजी सरपंच उद्धव भगत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ जनसामान्य ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार बांधकाम व्यावसायिक उद्योजक संजय वाडेकर यांच्या पत्नी सुप्रिया वाडेकर व माजी सरपंच कृष्णाजी भगत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ जनसेवा परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार पोल्ट्री व्यावसायिक श्याम भगत यांच्या पत्नी ईर्षा भगत यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. तर, मनीषा रमेश भगत या अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com