Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : पावसाच्या दडीने शेतकऱ्यांना भरली हुडहुडी

Weather Issue : मोखाडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. चक्क ऑक्टोबर हीटप्रमाणे कडक उन्हाळा जाणवू लागला आहे.

Team Agrowon

Mumbai News : मोखाडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. चक्क ऑक्टोबर हीटप्रमाणे कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. उन्हाच्या काहिलीने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, मात्र आता भातशेतीत भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे खरिपाचे पीक धोक्यात येण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

पेरणी आणि लावणीच्या काळात शेतीला उपयुक्त पाऊस झाल्याने शेती बहरली आहे. त्यामुळे यंदा भरघोस पीक येण्याची आशा शेतकरीवर्गाला लागली आहे, मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. लावणी केलेल्या शेतात उन्हामुळे भेगा पडू लागल्या आहेत.

यंदा शेतीला उपयुक्त पाऊस बरसला आहे. त्यामुळे लावणी वेळेत पूर्ण झाली. पिके बहरली आहेत, मात्र आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पाऊस लवकर आला नाही, तर पीक हातून जाण्याची भीती आहे.
उमाकांत हमरे, शेतकरी, खोडाळा
अचानक ऊन पडल्याने पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, मात्र वेळीच औषध फवारणीनंतर करपा आटोक्यात येऊ शकेल, मात्र आठवडाभर पाऊस लांबल्यास पिके पिवळी पडून करपण्यास सुरुवात होईल.
आकाश सोळुंखे, मंडळ कृषी अधिकारी, मोखाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT