Farmer Issue : सततच्या पावसाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता

Rain Update : मुसळधार बरसत नसला तरी सतत होत असलेल्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाने खरीप हंगाम आता धोक्यात येऊ लागला आहे.
Rain Issue
Rain IssueAgrowon
Published on
Updated on

Amravati News : मुसळधार बरसत नसला तरी सतत होत असलेल्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाने खरीप हंगाम आता धोक्यात येऊ लागला आहे. पीक वाढीच्या या कालावधीत अंतर मशागत करणे अडचणीचे जाऊ लागल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण वाढू लागले आहे. सखल भागातील शेतीत पाणी साचत असल्याने सोयाबीन पिवळे पडू लागले आहे, तर तूर व कापसालाही धोका निर्माण झाला आहे.

यंदा मॉन्सून विलंबाने आल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलैतील पावसाने पेरण्यांना वेग आला व जिल्ह्यातील ९७ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले. सोयाबीन, कापूस व तूर या मुख्य पिकांची पेरणी बहुतांश शेतकऱ्यांनी केली. ही पिके वाढीच्या अवस्थेत असताना त्यांना आंतरमशागतींची आवश्यकता आहे.

Rain Issue
Kharif Crop Issue : सततच्या पावसामुळे खरीप पिकांना धोका

मात्र जुलैपाठोपाठ ऑगस्टमध्येही पावसाने उसंत घेतली नसल्याने मशागतीला वेळ मिळेनासा झाला आहे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी साचत असल्याने सोयाबीन पिवळे पडू लागले आहे. तर, कापूस व तुरीवर रोगांच्या आक्रमणाची भीती वाढली आहे.

सततच्या पावसामुळे शेतात जाणे कठीण झाले असून शेत ओले असल्याने मशागतीला अडचणी निर्माण झाली आहे. निंदणासह डवरणी देणे व रोगांचे आक्रमण रोखण्यासाठी फवारणीची गरज असताना या कामांना सुरुवात करता येऊ शकली नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. गत वर्षीच्या हंगामात जुलैमध्ये अतिवृष्टी व ऑगस्टमध्ये पावसाने खंड दिल्याने पिकांचे नुकसान झाले होते.

Rain Issue
Rain Update : पावसाची उघडीप; पिकांमध्ये वाफसा

यंदा या दोन्ही महिन्यांत सतत हलका व मध्यम पाऊस होत असल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. जुलैमध्ये अपेक्षित २७७ मिमी पावसाच्या तुलनेत ३०२ मिमी ( १०८ टक्के) पाऊस झाला, तर जूनमध्ये १३१ मिमी पाऊस झाला होता. तो अपेक्षित पावसाच्या ९० टक्के होता. तर ११ ऑगस्टपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस झाला आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेताच्या वाटेवर चिखल झाल्याने जाणे कठीण झाले आहे. निंदण व डवरणीसह फवारणी करणेही शक्य होत नाही. पिकांवर रोगराई येऊ लागली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
लक्ष्मण कुऱ्हाडे, शेतकरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com