Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा थकबाकीसाठी कृषी आयुक्तालयावर धडकणार शेतकरी

Crop Damage Compensation : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी मंजूर झालेल्या पिकविमा भरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

Team Agrowon

Pune News : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी मंजूर झालेल्या पिकविमा भरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. पिकविम्याची थकित रक्कम मिळावी, यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्त्वात ९ सप्टेंबरला शेतकरी कृषी आयुक्तालयावर धडक देणार आहेत. या मोर्चामध्ये राज्यभरातून शेतकरी येणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

या संदर्भात स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये म्हटले आहे की, राज्यात २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामातील थकित पीक विम्याच्या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. पीकविम्याच्या थकबाकीसाठी जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने झाली. मात्र, खोट्या आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही.

राज्यातील २१ लाख ४५ हजार ६६५ शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची थकित रक्कम विमा कंपन्यांकडून येणे बाकी आहे. ही थकित रक्कम २ हजार ३०६ कोटी रुपये असून ती सरकारकडून कंपनीला देण्यात आली, तरच ती शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

तसेच गेल्या दीडवर्षांपासून शेतकरी पिकविम्याच्या थकित रक्कमेची आशेने वाट पाहात आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाही. सरकारी अधिकारी व कंपन्यांनी दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे पुन्हा सरकारचे लक्ष या महत्वाच्या विषयाकडे वेधण्यासाठी कृषी आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने तातडीने पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास या मोर्चात पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.

असा असणार मोर्चाचा मार्ग

या मोर्चाला ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता, पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतुळ्यापासून सुरुवात होईल. अलंकार टॉकीज चौक, साधू वासवानी चौक मार्गे सेंट्रल बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयावर जाईल. ज्या शेतकऱ्यांचा पीकविमा मिळणे बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात संघटनेमार्फत करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT