Namo Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Shetkari Sanman Scheme : शेतकऱ्यांना ‘नमो’चा पहिला हप्ता गुरुवारी

Agriculture Scheme : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी (ता. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी (ता. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो’ योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, ‘महाआयटी’ने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे ‘नमो’च्या वितरणास विलंब होत होता. ‘शेतकरी सन्मान योजने’च्या १४ व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात राज्याच्या या योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील, असे सांगितले जात होते. मात्र, कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवीत पुन्हा पडताळणी केली. त्यात ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे.

केंद्राचा १४ वा हप्ता ८५. ६० लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या ९३. ०७ लाख झाली आहे. वास्तविक, केंद्राचा १४ वा हप्ता ८५. ६० लाख शेतकऱ्यांना दिला गेला.

त्यापोटी १ हजार ८६६ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्यात आले. सध्या राज्य सरकारच्या ‘नमो’ची लाभार्थी संख्या नेमकी किती याबाबत स्पष्टता नाही.

कृषी विभागाची लाभार्थी पडताळणी (१६ ऑक्टोबरपर्यंत)

- ‘पीएम किसान’च्या १४ व्या हप्त्याचे लाभार्थी : ८५. ६० लाख

- राज्यातील एकूण पात्र लाभार्थी : ९३. ०७ लाख

- भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेले लाभार्थी : ९१. ९२ लाख

- अद्ययावत प्रलंबित लाभार्थी : १. १५ लाख

- बँक खाती आधारसंलग्न प्रलंबित लाभार्थी ः ५. ९८ लाख

- ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थी : ५. २६ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT