Agriculture News : महाराष्ट्र सरकारकडून खरिप हंगामासाठी १ रुपयात विमा उपलब्द करून दिल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. दरम्यान याच धर्तीवर राज्य सरकारने रब्बी हंगामाच्या पिकांसाठीही एक रुपयात विमा ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्य कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली.
खरिप हंगामात मिळालेल्या यशामुळे राज्य सरकारने रब्बी हंगामात १ रुपयात विमा कवच देण्यात येणार आहे. मागच्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ७ लाख ४५ हजार ३१६ शेतकऱ्यांनी ५ लाख ३४ हजार ९४७ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. यामध्ये २ हजार ३२ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली होती.
यातून हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ३३ कोटी रुपये देण्यात आले होते. तर केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी सुमारे १२२ कोटी दिले होते. तर एकूण विमा हप्ता २७७ कोटी रुपयांचा होता. त्यापैकी ५० हजार ६७५ शेतकऱ्यांना १८ कोटी ९० लाख रुपयांची भरपाई देण्यात आली.
शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत, तर गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्चपर्यंत सहभागी होता येईल. वेबसाइटची लिंक http://pmfby.gov.in
पुणे, हिंगोली, अकोला, धुळे व धाराशिव जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येणार आहे. सातारा, नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून, आठवडाभरात जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३७८ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम पडणार आहे. हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची रक्कम दर वर्षाला १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडते.
यावर्षी मात्र, विमा कंपनीने केळी उत्पादकांच्या केळी लागवड क्षेत्राच्या पडताळणीचा घाट घातल्यामुळे मुदत संपल्यावर देखील खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम पडलेली नव्हती. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा सुरु होता
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.