Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Compensation : शेतकऱ्यांना मिळणार भात पिकाची भरपाई

Paddy Crop Damage : नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने झालेल्या १४१ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील ५५० शेतकऱ्यांना भात पिकाच्या नुकसान भरपाईपोटी पंचवीस लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी बॅंक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

तालुक्यात नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने झालेल्या १४१ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले होते.

या नुकसानीचे पंचनामे तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांच्या मार्गदर्शनातून महसूल विभाग, कृषी विभाग यांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांनी पंचनामे केले होते.

त्यानुसार आता मुळशीतील सुमारे ५५० शेतकऱ्यांस त्यांच्या बॅंक खात्यावर पंचवीस लाख रुपयांची रक्कम जमा होणार असून यासाठी यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी ही रक्कम मिळण्यासाठी आपल्या बॅंक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून यासाठी बॅंक खात्याला आधार कार्ड क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे.

बॅंक खात्याला आधार कार्ड क्रमांक संलग्न असेल तर आधार प्रमाणीकरण करताना लगेचच शेतकऱ्यांच्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल व हा ओटीपी आधार प्रमाणीकरण करताना दिला की लगेचच आधार प्रमाणीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल व नंतरच हे नुकसान भरपाईचे पैसे बॅंक खात्यावर जमा होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी जवळील महा-ई सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्रांवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT