Cotton Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Mission 2025 : अहिल्यानगरमध्ये १२ गावांत विकसित कृषी संकल्प अभियान

Kharif Season 2025 : कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन १२ जूनपर्यंत करण्यात आले आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : कॄषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती तसेच कृषी विभाग व आत्मा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यात राबविण्यात आलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन १२ जूनपर्यंत करण्यात आले आहे. तालुक्यातील निंबोडी, जांब, सोनेवाडी, निंबळक, इसळक, खारे-कर्जुने, बहिरवाडी, विळद, नांदगाव, सारोळा कासार, सोनवाडी आणि नेप्ती या निवडक १२ गावांत अभियानाअंतर्गत कृषी विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाच्या माध्यमातून केव्हीके दहिगाव-ने व राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टीने तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी व ‘आत्मा’ नगरच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.

या अभियानाच्या दरम्यान केंद्राच्या मार्फत कृषी रथ फिरवून कृषी योजना व कृषी तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच या कालावधीमध्ये विविध नवीन तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर देण्यात आली.

या अभियानामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. ससाणे, डॉ. अत्तार, श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-नेचे शास्त्रज्ञ माणिक लाखे, नारायण निबे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, राहुल पाटील, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट तसेच नियासम बारामतीचे शास्त्रज्ञ डॉ. डी. डी. नांगरे व डॉ. सुशील चांगण, कृषी विभागाचे अधिकारी संदीप वराळे, माधवी घोरपडे, नारायण करंडे, अशोक वाळके, व ‘आत्मा’ नगरचे अधिकारी उमेश डोईफोडे, प्रवीण गोरे यांनी सहभाग घेतला. तसेच या अभियानामधील १२ गावांतील सरपंचश्री, शेतकरी उत्पादक कंपन्या, पुरुष व महिला शेतकरी गट, नैसर्गिक शेती गटाचे प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT