Agri Mission 2025 : विकसित कृषी संकल्पांतर्गत शास्त्रज्ञ थेट बांधावर

Kharif Planning : या अभियानात भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीअंतर्गत संस्थेतील शास्त्रज्ञ, केव्हीके, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, गावातील सरपंच व इतर पदाधिकारी तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी बांधावर सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
Agri Mission 2025
Agri Mission 2025Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव या गावांत विकसित कृषी संकल्प अभियान - २०२५ राबवण्यात येत आहे. या अभियानात तब्बल २४ गावात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या अभियानात भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीअंतर्गत संस्थेतील शास्त्रज्ञ, केव्हीके, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, गावातील सरपंच व इतर पदाधिकारी तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी बांधावर सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया, बीज उगवणक्षमता तपासणी, माती परिक्षण सुधारित लागवड तंत्रज्ञान इत्यादी बाबींवर प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात येत आहे.

Agri Mission 2025
Kharif Sowing : खानदेशात धूळपेरणी अल्प

या अभियानात शास्त्रज्ञांकडून खरीप हंगाम पूर्व नियोजन, पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय उभारणी, फळबाग लागवड तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शासनाच्या विविध योजना, शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, महिला आरोग्य व्यवस्थापन, महिला गृह उद्योग उभारणी, माती परीक्षण व जमीन आरोग्य व्यवस्थापन, शेतीसाठी ड्रोनचा वापर या आणि अशा विविध विषयावर शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच शेतकरी बांधवांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सर्व शास्त्रज्ञांच्या वतीने देण्यात आली. याबरोबरच गावातील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्व सहभागींना सांगण्यात आल्या. शेतकरी बांधवांचे प्रत्याभरण घेऊन त्यानुसार शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबरच शेतकरी बांधवांच्या प्रक्षेत्रावर भेटी देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेऊन शेती संदर्भातील योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

६ ते ९ जून या कालावधीत फुलंब्री तालुक्यातील २४ गावांत तर १० जून व ११ जून रोजी सिल्लोड तालुक्यातील १२ गावांत तर १२ जून रोजी सोयगाव तालुक्यातील ६ गावांत अभियान राबवण्यात येणार आहे.

Agri Mission 2025
Kharif Sowing : पारोळ्यात ३२ हजार हेक्टर क्षेत्रात कोरडवाहू पिके पेरणीची प्रतीक्षा

यात केव्हीके प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर, अशोक निर्वळ, किशोर शेरे, सतीश कदम, शिवा काजळे, जयदेव सिंगल, जयदीप बनसोडे, विशाल दाभाडे यांच्यासह केव्हीकेचे सर्व कर्मचारी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यालय येथील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, इफको व इतर विविध विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत.

अभियानाचे उद्दिष्ट

प्रमुख पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना जागरूक करणे

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सरकारी योजना-नीतींबद्दल जागरूक करणे

शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्य कार्डात सुचवलेल्या विविध पिकांच्या निवडीसाठी आणि संतुलित खतांच्या वापरासाठी जागरूक आणि शिक्षित करणे

शेतकऱ्यांकडून फीडबॅक प्राप्त करणे, ज्यामुळे त्यांच्या नवोपक्रम बद्दल वैज्ञानिक माहिती मिळवून संशोधनाच्या दिशेचा निर्धार केला जाऊ शकेल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com