Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेतून परताव्यांची प्रतीक्षा

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना कमी व अधिक तापमान आणि वादळ, गारपिटीत नुकसानीसंबंधीचे परतावे या महिन्यात मिळतील, असे संकेत होते. परंतु हे परतावे देण्याबाबत शासनाकडून कुठल्याही हालचाली नसल्याने केळी उत्पादकांत शासनाबाबत नाराजी वाढली आहे.

जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार केळी उत्पादक हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ मध्ये सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते. नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांसाठी केळी पिकाला थंडी, अधिक तापमान, वादळ (वेगाचा वारा), गारपीट या हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळते.

विमा संरक्षण कालावधीत जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा या तालुक्यांत वादळ व गारपीट झाली. यासंबंधी विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर एक-दोन दिवसांत कंपनीला सूचना दिली. यानंतर पंचनामे झाले. विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारीदेखील पंचनाम्यांसाठी दाखल झाले होते.

विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावे देण्याचे या योजनेत निर्देशीत आहे. शासन व विमा कंपनीने थंडी व उष्णता यात नुकसानीसंबंधी परतावे या महिन्याच्या सुरुवातीला मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु शासनाकडून कोणतेही नियोजन झालेले नाही.

शेतकरी याबाबत मागण्या करीत असून, याबाबत तातडीने संबंधितांनी दखल घ्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२२-२३ च्या हंगामातील परताव्यांचा घोळ सुरूच आहे. असा घोळ यंदा करू नये व याच आठवड्यात परतावे पात्र शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : आमची पीकं तुमचे दर, हे नाही चालणार, सोयाबीन दरावरून राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा; सोमवारी काढणार ट्रॅक्टर मोर्चा

Goat Sheep Subsidy : मिल्किंग मशिनसह शेळी-बोकड गट मिळणार अनुदानावर

Authentic Seeds : पंदेकृवीत रब्बीसाठी हरभरा, गहू, ज्वारीचे सत्यप्रत बियाणे उपलब्ध

Sunflower Sowing : पुणे विभागात आठ हजार हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधी लाभातील अडचणी दूर करा

SCROLL FOR NEXT