Farmer Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Compensation: अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे रखडले; बदनापूर तहसीलदारांनी कृषी सहायक, ग्रामसेवकांना फटकारले

Crop Damage 2025: बदनापूर तालुक्यातील १८ गावांमध्ये मे महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.

Sainath Jadhav

Jalana News: बदनापूर तालुक्यातील १८ गावांमध्ये मे महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. मात्र, एक महिना उलटूनही नुकसानीचे पंचनामे पूर्ण न झाल्याने तहसीलदारांनी कृषी सहायक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

५ मे ते ७ मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तहसीलदारांनी कृषी सहायक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना संयुक्त पथकाद्वारे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी केवळ शेतकरी संख्या आणि क्षेत्र किती अशी माहिती पाठवली, तर पूर्ण पंचनामे आणि अहवाल सादर केले नाहीत.

प्रभारी तहसीलदार हेमंत तायडे यांनी कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, १६ जून रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तात्काळ पंचनामे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

तरीही १७ जूनपर्यंत अहवाल सादर न झाल्याने कर्मचाऱ्यांना २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, नुकसानीची टक्केवारी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास प्राथमिक अहवाल का सादर केला आणि तीन दिवसांत समक्ष पाहणी का केली नाही, याचाही खुलासा मागितला आहे.

पुढील गावांमध्ये अद्याप पंचनामे झाले नाहीत: सोमठाणा, राळा, केळीगव्हाण, निकळक, भराडखेडा, उज्जैनपुरी, वाल्हा कंडारी बु, नजीक पांगरी, गेवराई बाजार, हिवराराळा, गोकुळवाडी, थोपटेश्वर, अकोला, अन्वी, देवगाव, बावणे पांगरी आणि आसरखेडा. या गावांतील तलाठ्यांना नोटीसी पाठवण्यात आल्या आहेत.

तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना २३ जून रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात हजर राहून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Intervierw with Sunil Tambe: मॉन्सूनने घडवली शेती, माती, संस्कृती

World Rabies Day: जागरूकतेतूनच रेबीज पासून बचाव शक्य

iPhone Craze: आयफोन नावाचे स्टेट्स सिम्बॉल

Monsoon Diaries: पाऊस आपल्यासारखंच वागतोय...

Wheat Varieties: गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाण

SCROLL FOR NEXT