Kharif Season 2025  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2025 : खरीप हंगामात टोकण यंत्राची साथ

Kharif Sowing : सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, तूर व इतर कडधान्यांबरोबरच भुईमुगाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. या पेरणी काळात मजुरांची सर्वत्र कमतरता भासत आहे.

Team Agrowon

Buldana News : सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, तूर व इतर कडधान्यांबरोबरच भुईमुगाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. या पेरणी काळात मजुरांची सर्वत्र कमतरता भासत आहे. यावर पर्याय म्हणून सध्या शेतकरी टोकण यंत्राला पसंती देत असून त्याद्वारे पेरणी करीत आहेत. या लागवड पद्धतीने वेळ, पैसा तसेच श्रमातही बचत होत आहे.

पेरणीची लगबग म्हटली की शेतकऱ्याला कामे आटोपण्याची घाई असते. नेमके त्याच वेळेस मजुरांची कमतरता भासते. त्याबरोबरच मजुरीचे दरही गगनाला भिडतात. गेल्या काही वर्षांत शेतीत आधुनिकता आली असून यांत्रिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

सध्या या तालुक्यासह परिसरात पावसाने दमदार एन्ट्री केल्याने पेरणीला वेग आला आहे. तालुक्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी शेतकरी करीत असून मजुरांची एकच धांदल उडाली. शेतकऱ्यांनी मका, तूर, सोयाबीन, उडीद, मूग व भुईमुगाच्या पेरणीसाठी सर्रास टोकण यंत्र वापरण्याकडे भर दिला आहे.

पेरणीचे हे टोकण यंत्र वाजवी किमतीत उपलब्ध असून वापरण्यास अगदी सोपे आहे. वजनाने हलके असल्याने एक व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो व पेरणी करू शकतो.

एका दिवसात चार ते पाच एकरची पेरणी

या यंत्राच्या साहाय्याने बियाणे टोकण केले जाते. यात वेगवेगळ्या प्रकारचे टोकण रोलर असल्याने सर्व प्रकारचे बियाणे लावता येते. बियाण्याची खोली आणि एक व दोन बियाणे एकदाच टोकण करता येतात. या यंत्रात एकावेळी जवळपास दोन किलो बियाणे बसते. एक व्यक्ती एका दिवसात चार ते पाच एकर बियाणे शेतात सहज टोकण करू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT