Maize Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Sowing : रब्बीत शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल

Rabi Season : खरीप हंगामात कमी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ होऊ लागली आहे.

Team Agrowon

Pune News : खरीप हंगामात कमी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ होऊ लागली आहे.

पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या ६७ हजार ५५८ हेक्टरपैकी ३० हजार ९९० हेक्टरवर मका पीक घेतले आहे. त्यामुळे येत्या काळात जनावरांसाठी काही प्रमाणात चारा उपलब्ध होईल.

विविध तालुक्यांत डेअरी उद्योगांच्या माध्यमातून दुग्धपूरक उद्योग वाढीस लागले आहेत. मका पिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन दुधाची गुणवत्ता चांगली येते.

त्यासोबतच मक्याच्या चाऱ्याचा वापर करून मुरघास म्हणून केला जातो. उन्हाळ्यात सुद्धा ओल्या चाऱ्याची उपलब्धता मुरघासामुळे जनावरांना होते. त्यामुळे जनावरांच्या दुग्ध उत्पादनात कोणताही बदल होत नसल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक नफा मिळतो.

पुणे विभागासह राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, कालवडी, बैल यांची जवळपास तीन ते साडेतीन कोटी जनावरांची संख्या आहे. यंदा कमी पावसामुळे चाराटंचाई भासू नये म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहेत.

पुणे परिसरातील अनेक शेतकरी मक्याचे दाणे काढण्यासाठी मोठ्या आकाराच्या कणसाच्या मक्याची लागवड करतात. त्यामुळे मका लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पुणे विभागात पीकनिहाय

झालेली पेरणी (हेक्टर)

जिल्हा सरासरी

क्षेत्र लागवड

झालेले क्षेत्र टक्के

नगर १४,११८ ४,११५ २९

पुणे १६,९४७ ६,५६० ३९

सोलापूर ३६,४९३ २०,३१५ ५६

एकूण ६७,५५८ ३०,९९० ४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT