Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Help: धोंडिबाच्या मदतीला धावला कृषी विभाग

Farmer Dhondiba Gore Struggles: सह्याद्रीच्या वेळवंडी खोऱ्यातील दुर्गम पाड्यात राहणारा शेतकरी धोंडिबा भांबू गोरे यांची सरकारी योजनांसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेली वणवण थांबणार आहे. धोंडिबाला कायमस्वरूपी मदत मिळण्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनोज कापडे

Pune News: सह्याद्रीच्या वेळवंडी खोऱ्यातील दुर्गम पाड्यात राहणारा शेतकरी धोंडिबा भांबू गोरे यांची सरकारी योजनांसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेली वणवण थांबणार आहे. धोंडिबाला कायमस्वरूपी मदत मिळण्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नीरा आणि वेळवंडी नद्यांच्या खोऱ्यांत घाटमाथ्यावरील पर्वतरांगेत राहणारा ५२ वर्षांचा पशुपालक शेतकरी म्हणजे धोंडिबा गोरे. अतिपावसाचा हा भाग असल्याने भात, नाचणी, वरई सोडता धोंडिबाला उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे गुरेढोरे सांभाळत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा धोंडिबाकडे अठरा विश्वे दारिद्र्य आहे.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी खूप धडपड केली; परंतु त्याला मदत मिळालेली नाही. त्याची कहाणी ‘अॅग्रोवन’मधून पाच जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेत कृषी विभागाने धोंडिबाला योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धोंडिबाच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही.

धोंडिबाच्या मदतीसाठी कृषी उपायुक्त व ‘पीएम किसान’ योजनेचे राज्य समन्वयक दयानंद जाधव व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी क्षेत्रीय पातळीवर सूचना दिल्या आहेत. भोरचे तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत सरडे, कृषी पर्यवेक्षक रोहिदास चव्हाण, कृषी सहायक अमर इधाते या सर्वांनी प्रथमतः धोडिंबाची समस्या समजावून घेतली.

त्याला ‘पंतप्रधान अर्थात पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा लाभ देणे शक्य असल्याचे दिसून आले. परंतु, कोणतीही मूळ कागदपत्रे हाती नव्हती. त्यामुळे कृषी कर्मचारी थेट धोंडिबाच्या पाड्यावर गेले. तेथून कागदपत्रे गोळा केली गेली. थोडिंबाला तालुक्याला बोलावून योजनेशी संबंधित प्रस्ताव भरुन घेण्यात आला.

त्यानंतरही तांत्रिक कारणास्तव प्रस्ताव मंजूर होत नव्हता. त्यामुळे पुन्हा सूत्रे फिरली व अखेर धोंडिबाचा प्रस्ताव मंजूर केला गेला. ‘‘धोंडिबाचा प्रस्ताव आता केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याला लवकरच दोन योजनांचा कायमस्वरूपी लाभ मिळू शकेल,’’ असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

धोंडिबाची कहाणी ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध होताच कृषी कर्मचाऱ्यांनी त्याला मदत करण्याचा निर्धार केला. शासकीय योजनांपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, हेच आमचे ध्येय आहे.
दयानंद जाधव, कृषी उपायुक्त
स्थानिक पातळीवर धोंडिबाला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. कृषी कर्मचारी मात्र दुर्गम भागात त्याच्या पाड्यावर गेले. तेथे त्यांनी कागदपत्रे जमा करीत आधार संलग्नता, फेरफार उतारे अशी किचकट कामे मार्गी लावली. त्यामुळे धोंडिबाला आता योजनांचे लाभ मिळतील.
शरद धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भोर, जि. पुणे
सरकारी योजनांसाठी मी दोन वर्षांपासून चकरा मारतो आहे. माझी बातमी छापून आल्यानंतर कृषी खात्याचे कर्मचारी माझ्या घरी आले. त्यांनी माझी दखल घेत सर्व कागदपत्रे भरून घेतली आहेत. मी मदतीची वाट पाहात आहे.
धोंडिबा भांबू गोरे, शेतकरी, सांगवी, वेळवंडी खोरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT