Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : सेलू-देवगाव फाटा महामार्गावर शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग भूसंपादन होत गावात खरेदी-विक्रीचे दर पाहूनच मूल्यांकन करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करावी.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांतून जात असलेल्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडीमोल भाव देणारी बेकायदेशीर मूल्यांकन प्रक्रिया तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी सोमवारी (ता.२६) सेलू ते देवगाव फाटा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग भूसंपादन होत गावात खरेदी-विक्रीचे दर पाहूनच मूल्यांकन करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करावी, बाजारभावास गुणांक दोन वापरून पाचपट मोबदला देण्यास यावा, जमिनीचे अधिग्रहण १९५५ च्या कायद्याप्रमाणे न करता संपूर्ण प्रक्रिया २०१३ च्या कायद्याप्रमाणे राबवावी.

यांसह विविध मागण्या मान्य होईपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा भुसंपादनास विरोध राहील व यापुढे महामार्गात जमीन संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामेश्वर गाडेकर, सुंदर गाडेकर, अनिरुद्ध नाईक, विजय खरात, रमेश माने, संजय गाडेकर, अमृतराव शिंदे, गणेश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT