Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

land Acquisition : जिल्ह्यात एक जुलैपासून जिल्हा प्रशासनाने शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या सीमांकन व मोजणीला सुरुवात केली आहे. २७ जुलैपर्यंत मोजणीचे वेळापत्रक प्रशासनाने निश्‍चित केले आहे.

Team Agrowon

Latur News : शक्तिपीठ महामार्गाला आम्हाला जमीन द्यायची नाही, या विषयात आम्हाला काही व कोणाचे ऐकायचं नाही, तुम्ही गपगुमान परत जा, शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा पंचनामा करा, तो आम्हाला वाचून दाखवा व परत जा, अशा समजावणीच्या सुरात शेतकऱ्यांनी विरोध करत जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले.

मोजणीच्या वेळापत्रकानुसार दोन दिवसांत रेणापूर तालुक्यातील मोरवड व मोटेगावनंतर शुक्रवारी (ता. चार) कासारजवळा (ता. लातूर) येथेही शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला. यामुळे मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाच्या पथकाला परतावे लागले. असे असले तरी वेळापत्रकानुसार पुढील काही दिवस ठरलेल्या ठिकाणी मोजणीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात एक जुलैपासून जिल्हा प्रशासनाने शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या सीमांकन व मोजणीला सुरुवात केली आहे. २७ जुलैपर्यंत मोजणीचे वेळापत्रक प्रशासनाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी संबंधित भागात जाऊन मोजणी करत आहेत.

पहिल्याच दिवशी मोजणीला विरोध झाल्यानंतरही अधिकारी व कर्मचारी वेळापत्रकानुसार मोजणी व सीमांकनासाठी जात आहेत. तिथेही शेतकरी त्यांना विरोध करत असून पहिल्या दिवशी असलेला शेतकऱ्यांची आक्रमकता कमी होत आता शांततेत व संयमाने विरोध करत आहेत.

रेणापूर तालुक्यात मोरवड आणि मोटेगाव येथे गुरुवारी (ता. तीन) शेतकऱ्यांनी समजावणीच्या सुरातच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला व त्यांना परत पाठवले. शुक्रवारी कासारजवळा येथेही शेतकऱ्यांनी वाद न घालता अधिकाऱ्यांना संयमाने विरोध केला. आम्हाला जमीन द्यायची नाही, जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या आदी भूमिका घेत शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT