E-Pik Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E-Pik Pahani : शेतकऱ्यांनी तत्काळ करून घ्यावी ई-पीक नोंदणी

E-Crop Survey : पंतप्रधान पीकविमा योजना व नैसर्गिक आपत्तीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपद्वारे १५ ऑक्टोबरपर्यंत ई-पीक नोंदणी करून घ्यावी,’’ असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘खरीप हंगाम २०२३’ मध्ये मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले. तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान पीकविमा योजना व नैसर्गिक आपत्तीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपद्वारे १५ ऑक्टोबरपर्यंत ई-पीक नोंदणी करून घ्यावी,’’ असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

‘‘पिकांची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ई-पीकपाहणीचा उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे शेतकऱ्यांना मोबाइल अॅपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ई-पीक नोंदणी प्रलंबित आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास व पिकांची नोंद असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अचूक व लवकर मिळते. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो. पीकविमा आणि पीक नोंदणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते. अॅपवर नोंद असल्यास सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येत नाही,’’ असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT