Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: शेतकऱ्यांनी १० जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये: कृषी विभागाचे आवाहन

Sowing Advice: राज्यात मॉन्सूनचा प्रवास रखडल्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना १० जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे. सध्याचे कोरडे हवामान व वाढते तापमान पेरणीस अयोग्य असल्याने, चुकीच्या अंदाजांवर विश्वास न ठेवता प्रतीक्षा करणे हितकारक ठरणार आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: बदललेल्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली असल्याने मॉन्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत पेरण्यांची घाई करू, नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

किमान १० जूनपर्यंत तरी मॉन्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे यादरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल.

विदर्भात ४० अंशांपर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा अंदाज

Farm Relief: अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत करा

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता पती, वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक, काय आहे नवीन नियम

Fish Food: मत्स्यखाद्यासाठी ब्लॅक सोल्जर माशीच्या अळ्या

SCROLL FOR NEXT